Home | International | Pakistan | america-nato-attack

पाकमध्ये घुसुन अमेरिकेची पुन्हा कारवाई, 5 दहशतवाद्यांना अटक

agencies | Update - May 31, 2011, 12:17 PM IST

ओसामा बिन लादेनला संपविल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वायुसीमेचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. नाटोच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या वायु सीमेत घुसुन उत्तरी वजिरीस्तान भागात हल्ले केले.

  • america-nato-attack

    ओसामा बिन लादेनला संपविल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वायु सीमेचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. नाटोच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या वायु सीमेत घुसुन उत्तरी वजिरीस्तान भागात हल्ले केले. सुत्रांच्या माहितीनुसार, लादेनवर ज्या पद्धतीने हल्ला केला होता, त्याच पद्धतीचा हा हल्ला होता. नोटोच्या सैनिकांचे दोन हेलिकॉप्टर वजिरीस्तानच्या भागात घुसले. अल कायदाशी निकटचे संबंध असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या ५ दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
    लादेनचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने अशा पद्धतीची कारवाई न करण्याची धमकी दिली होती. परंतु, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अशा प्रकारची कारवाई सुरुच राहील, असे प्रत्युत्तर अमेरिकेने दिले होते. त्यानुसार अमेरिकेने धमकीला न जुमानता पाकिस्तानला कोणतीही सुचना न देता हा हल्ला केला आहे. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात नेण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.


    आपले मत
    अमेरिकेने केलेली कारवाई योग्य आहे काय? आपले मत खाली दिलेल्या कॉमेन्ट बॉक्समध्ये लिहून व्यक्त करा. कोणत्याही आपत्तीजनक मतासाठी वाचक स्वत: जबाबदार असतील.


Trending