आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America On Narendra Modi News In Marathi, BJP Manifesto

नको तेथे नाक खुपसणारी अमेरिका भाजपच्या जाहीरनाम्यावर म्हणाली, \'नो कॉमेंट्स\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास आण्विक धोरणात बदल केला जाईल, या भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर प्रतिक्रिया देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्हिसा प्रश्नावरून मोदी आणि अमेरिकेचे संबंध आधीच ताणले गेले असल्याने आता जाहीनाम्यावर कॉमेंट्स करून अमेरिकेला पुन्हा वाद ओढवून घ्यायचा नाही, असे यावरून दिसून येते. त्यामुळे सध्या तरी अमेरिकेने "वेट अॅंड वॉच" असे मवाळ धोरण अवलंबिले आहे.
यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेन साकी म्हणाले, की भारतात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आम्हाला कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यावर कॉमेंट करायची नाही. परंतु, आमच्या धोरणात किंचितही बदल झालेला नाही. यापेक्षा मला अधिक माहिती द्यायची नाही. यासंदर्भात आम्ही भारतीय सरकारसोबत चर्चा केलेली आहे.
सद्यस्थितीशी अनुकूल करण्यासाठी भारत-अमेरिका अणू कराराच्या तरतुदींचा अभ्यास करून त्यात आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील, असे भाजपच्या जाहीरनाम्यान सांगण्यात आले आहे.
साकी यांच्या स्पष्टीकरणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की निवडणूक सुरू असताना एखाद्या पक्षाच्या अंतर्गत विषयावर अमेरिका कधीही टिप्पणी करणार नाही. अमेरिकेचे हे धोरण आहे.