आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • America, Professor Holds Baby For 3 Hours In Class So His Mother Could Take Notes

महिला प्रोफेसरने 3 तास बाळाला पाठीवर बांधून शिकवले, सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉर्जिया- लॉरेंसविलेच्या ग्विनेट कॉलेजतील एका असिस्टेंट प्रोफेसरने आपल्या एका विद्यार्थीनीला नीट लेक्चर अटेंड करता यावे म्हणून , तिच्या बाळाला 3 तास आपल्या पाठीवर बांधून ठेवले. या घटनेचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोला प्रोफेसरच्या मुलीनेच 20 सप्टेंबरला सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याला आतापर्यंत 57 हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. 

डॉ. रमता सिसोको सिसे ग्विनेट कॉलेजमध्ये बायोलॉजी, एनाटॉमी आणि फिजियोलॉजी हे विषय शिकवतात. काही दिवसांपूर्वी त्यांची एक विद्यार्थीनी घरात बाळाची काळजी घेण्यसाठी कोणी नाहीये, म्हणून आपल्या बाळासोबत कॉलेजला आली. लेक्चर दरम्यान डॉ. सिसे यांना समजले की, त्या मुलीला आपल्या बाळासोबत बसून केक्चर नीट अटेंड करता येत नाहीये. त्यानंतर त्यांनी त्या बाळाला आपल्या जवळ घेतले आणि तीन तास त्याला पाठीवर बांधून विद्यार्थांना शिकवले.

बातम्या आणखी आहेत...