आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी अर्थतज्ज्ञ विल्यम नोरधॉस- पॉल रोमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - या वर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकी अर्थतज्ज्ञ विल्यम नाेरधॉस आणि पॉल रोमर यांना मिळाला आहे. त्यांनी १९९० च्या दशकात इनोव्हेशन आणि जलवायू परिवर्तनला आर्थिक विकासाला जोडणारी थेअरी मांडली होती. त्यानंतर त्यांच्या या थेअरीवर अनेक संशोधकांनी संशोधन केले. सुमारे ७.५ कोटी रुपयांची पुरस्काराची ही रक्कम दोघांमध्ये बरोबरीत वाटली जाणार आहे. त्यांना १० डिसेंबर रोजी विशेष समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार देणारी संस्था रॉयल स्विडिश अकादमीनुसार त्यांच्या सिद्धांतामुळे माहिती आणि निसर्ग बाजार आधारित अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम करतो, याची व्याख्या तयार करण्यास मदत मिळाली. 


आतापर्यंत ८१ तज्ञांना मिळाला अर्थशास्त्रातील नोबेल 
- हा अर्थशास्त्रातील ५० वा नोबेल पुरस्कार आहे. इतर पुरस्कार १९०१ मध्ये सुरू झाले होते. मात्र, अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार १९६९ मध्ये दिला गेला. 
- हा पुरस्कार २५ वेळा एकाच अर्थतज्ज्ञांना देण्यात आला. त्या नंतर १९ वेळा दोन व्यक्तींना, तर ६ वेळा तीन अर्थतज्ज्ञांना देण्यात आला. 
- महिला अर्थतज्ज्ञाला आतापर्यंत केवळ एकदा नोबेल मिळालेला आहे. एलिनॉर ऑस्ट्रॉमला १००९ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. 
- केनेथ एरो हे नोबेल मिळवणारे सर्वात कमी वयाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांना १९७२ मध्ये वयाच्या ५१ वर्षी सन्मानित करण्यात आले होते. 
- लियोनिड हरविच हे हा पुरस्कार मिळवणारे सर्वाधिक वयाचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना वयाच्या ९० व्या वर्षी २००७ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...