आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • America : Soldier Spent $ 200 To Get Soil In Italy From America, So That Son Could Be Born On The Soil Of The Country

सैनिकाने 200 डॉलर खर्च करून मागवली मायदेशातील माती, जेणेकरुन मुलाचा जन्म मातृभूमीच्या मातीवर होऊ शकेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैनिक म्हणाला - या आनंदासाठी एखाद्याने मोठ्या रकमेची मागणी केली तरी ती दिली असती
  • जवानाला वाटले की प्रसूतीपूर्वी तो मायदेशी परत जाईल, पण तसे झाले नाही, अखेर माती मागवण्याचा घेतला निर्णय

न्यूयॉर्क - बाळाचा जन्म मायदेशातल्या मातीवर व्हावा यासाठी इटलीमध्ये तैनात असलेला अमेरिकन सैनिक टोनी ट्रॅकोनी यांनी अमेरिकेतून माती मागवली.  टोनी यांची पत्नी गरोदर होती, तेव्हा ते इटलीच्या पेडोव्हा प्रांतात तैनात होते. प्रसूतीपूर्वी कदाचित ते मायदेशी परततील असे त्यांना वाटले होते. मात्र असे झाले नाही.  बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पाय त्याच्या आईवडिलांच्या देशाच्या मातीला लागावेत, यासाठी त्यांनी प्रसूतीच्या एक महिना आधी टेक्सास प्रांतातील माती इटलीला मागवली. टोनीने यासाठी पालकांची मदत घेतली. त्यांनी कंटेनरमध्ये माती टाकून जहाजातून पाठवली. यासाठी १४ हजार  ५०० रुपये (२०० डॉलर) खर्च लागला. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर त्यांनी त्याचे पाय मायदेशातील मातीवर ठेवले.