Home | International | Other Country | America stopped Pakistan's fund

पॉम्पिआेंच्या दौऱ्याअगोदर पाकीस्तानची ३० कोटी डॉलर्सची मदत गुंडाळली; अमेरिकेचा निर्णय

वृत्तसंस्था | Update - Sep 03, 2018, 08:39 AM IST

पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या विविध गटांच्या विरोधात काहीही ठाेस उपाययोजना करणे जमलेले नाही, असा ठपका ठेवून अमेरिकेच्या सं

 • America stopped Pakistan's fund

  वॉशिंग्टन- पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या विविध गटांच्या विरोधात काहीही ठाेस उपाययोजना करणे जमलेले नाही, असा ठपका ठेवून अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनने पाकला लष्करी मदत देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आधी २ हजार १३० कोटी रुपयांची (३० कोटी डॉलर्स) मदत देऊ करणाऱ्या अमेरिका ही मदतीची योजनाच आता गुंडाळण्याची शक्यता आहे. परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिआे यांच्या आगामी पाक दाैऱ्याच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.


  दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई आणखी कडक करण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्याला पाकिस्तानने अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे अमेरिकेने ही भूमिका घेतली. ५ सप्टेंबर रोजी पाॅम्पियाेंचा नियोजित दौरा आहे. त्याआधीच अमेरिकेने पाकिस्तानला हा धक्का दिला. पेंटागाॅनने हा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला अमेरिकेच्या काँग्रेसने हिरवा कंदील देणे आवश्यक आहे. नियमानुसार आता ३० सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला या प्रस्तावासाठी परवानगी द्यावी लागेल. अमेरिकेने पाकिस्तानला १.५ अब्ज डॉलर्सची सुरक्षाविषयक आर्थिक मदतीची घोषणा जानेवारीत केली होती.


  हक्कानी गट, लष्कर-ए-तोयबाचा उच्छाद
  ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात दक्षिण आशियाविषयक धोरणाची घोषणा केली होती. त्यात त्या पाकिस्तानला हक्कानी गट, लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हक्कानी गटाच्या अफगाणिस्तान सीमाभागात सातत्याने कारवाया सुरू असतात. अफगाणिस्तानात अद्यापही अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. गेल्या १७ वर्षांपासून अमेरिका अफगाणमध्ये हक्कानी, तालिबानच्या विरोधात लढत आहे. त्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी पाकिस्तानने ठोस लष्करी कारवाई करणे अमेरिकेला अपेक्षित होते. मात्र एवढ्या वर्षांत पाककडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट मिळालेल्या पैशांचा वापर इतर ठिकाणी करून पाकिस्तानने अमेरिकेची फसवणूक केल्याचे दिसून आले आहे.


  इम्रान यांच्या अडचणी वाढणार
  पाकिस्तान-अमेरिका संबंध सुधारणे हे इम्रान खान यांच्यासाठी आव्हान आहे. पाकिस्तानची परदेशी गंगाजळ सातत्याने घटत आहे. मे २०१७ मध्ये पाकच्या परदेशी गंगाजळीत १.१२ लाख कोटी रुपये होते. आता ते ७० हजार कोटींवर आले आहेत.


  'एकतर्फी वागणे चालणार नाही'
  पॉम्पियो यांच्या दौऱ्यापूर्वीच नूतन पंतप्रधान इम्रान खान यांनी बैठकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प प्रशासनाने सन्मानपूर्वक वागणूक दिली तरच चर्चा होऊ शकेल. त्यांचे एकतर्फी मत मांडलेले चालणार नाही, असे इम्रान यांनी शुक्रवारीच सांगितले आहे. या बैठकीत पॉम्पियो पाकिस्तानच्या प्रमुखांशी दहशतवादाच्या उच्चाटनाचा मुद्द्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यांत उभय नेत्यांत फोनवरून संभाषण झाले होते.

Trending