आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन- अमेरिकेतील अल्बामा येथे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या मुस्लिम कैद्याच्या शिक्षेस शेवटच्या क्षणी स्थगिती देण्यात आली. कारण त्याला फाशीच्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी प्रशासनाने इमाम दिला नव्हता. यावरून अटलांटाच्या न्यायालयाने डॉमिनिक रे (४२) याच्या फाशीस बुधवारी स्थगिती दिली. त्याला एका १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९९५ मध्ये ही घटना घडली होती. रे याने तुरुंगात असताना धर्मांतर केले होते.
न्यायालयाने म्हटले, प्रशासनाने त्याला फाशीच्या ठिकाणी नेण्यास इमाम देण्यास नकार दिला होता. हे त्याच्या अधिकाराचे हनन ठरते. घटनात्मक अडचण अशी होती की, राज्यात ख्रिश्चन कैद्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शिक्षेच्या ठिकाणी एका ख्रिश्चन पादरीची व्यवस्था होती. ही सुविधा एका मुसलमान कैद्यास व इतर कैद्यांना देण्यास प्रशासनाचा नकार होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी कायद्यात प्रथम दुरुस्ती अधिकाऱ्यास एका धर्माच्या वर दुसऱ्या धर्मास वरिष्ठ दर्जा देण्यापासून रोखते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.