Home | International | Other Country | america-to-spying-other-citizen

सुरक्षेसाठी २०१५ पर्यंत परदेशी व्यक्तींची हेरगिरी करणार अमेरिका

वृत्तसंस्था | Update - May 21, 2011, 11:35 AM IST

अमेरिका आणखी चार वर्षे अन्य देशांतील नागरिकांची हेरगिरी करणार आहे.

  • america-to-spying-other-citizen

    वॉशिंग्टन - सुरेक्षेच्या नावाखाली आणखी चार वर्षे अमेरिका अन्य देशांतील नागरिकांची हेरगिरी करणार आहे. ११ सप्टेंबर २०११मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे लागू करण्यात आलेला पैट्रियट ऍक्टनुसार सुरक्षा अधिकाऱयांना अनिर्बंध अधिकार देण्यात आले आहेत.

    या कायद्यानुसार अमेरिकेतील सुरक्षा अधिकाऱयांना अन्य देशातील नागरिकांची तपासणी करणे, त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करणे, त्यांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती जमा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अन्य देशांतील नागरिकांन पाठविलेल्या ई-मेलची तपासणी करण्याचे अधिकारही सुरक्षारक्षकांना देण्यात आले आहेत. जेव्हापासून हा कायदा अंमलात आलाय, तेव्हापासून त्याच्यावर विविध लोकांनी टीका केलीये.

Trending