आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • America : Trump Acquitted Of All Charges, Third US President To Escape Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सर्व आरोपांमधून मुक्तता, या संकटातून बाहेर पडणारे तिसरे राष्ट्रपती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा होता आरोप
  • 49 दिवस चालली ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया
  • तीन शतकांत 3 राष्ट्रपतींवर महाभियोगची प्रक्रिया

वॉशिंग्टन - अमेरिकी संसदेच्या वरच्या सभागृहात बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगच्या सर्व आरोपातून मुक्तता झाली. ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग आणि संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. सीनेटमध्ये रिपब्लिकन्स(ट्रम्प यांचा पक्ष) बहुमत आहे. यामुळे ट्रम्प यांना सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपाखाली 52-48 तर संसदेच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली 53-47 मते मिळाली. महाभियोगाच्या संकटातून बाहेर पडणारे ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.उटाहचे सदस्य मिट रोमनी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात (सत्ता दुरुपयोगाच्या समर्थनात) ट्रम्प यांना मतदान केले. परंतु त्यांनी संसदेच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपात ट्रम्प यांच्या समर्थनात मत दिले. 

ट्रम्प यांची सर्व आरोपातून मुक्तता


संसदेतून आरोपमुक्त झाल्यानंतर व्हाइट हाउसच्या प्रवक्ता स्टेफनी ग्रीशम यांनी सांगितले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सर्व आरोपातून मुक्तता मिळाली आहे. हे एक प्रकारच्या पुनर्स्थापनेसारखे आहे. डेमोक्रेट्सची लज्जास्पद वागणूक ही आता भूतकाळातील गोष्ट आहे." डेमोक्रेट्स आगामी राष्ट्रपती निवडणुकीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रीशम यांनी केला. यामुळे डेमोक्रेट्सविरोधात कारवाई होऊ नये का? असा सवाल ग्रीशम यांनी यावेळी विचारला. 

डेमोक्रेट्सनी आणला होता महाभियोगाचा प्रस्ताव 

18 डिसेंबर रोजी प्रतिनिधी सभागृहातील खालच्या सभागृहात ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला गेला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडीमिर झॅलेन्स्की यांच्यावर 2020 मध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बिडेन आणि त्यांच्या मुलाविरोधात भ्रष्टाचाराच्या तपासासाठी दबाव आणल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप केला होता. बिडेन यांचा मुलगा युक्रेनच्या एका ऊर्जा कंपनीत मोठा अधिकारी आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी यु्क्रेनकडून मिळणारी आर्थिक मदत थांबवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तीन शतकांत 3 राष्ट्रपतींवर महाभियोगची प्रक्रिया 


अमेरिकेच्या 243 वर्षांच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाची प्रक्रिया होण्याची तिसरी घटना होती. यापूर्वी 19 व्या शतकात अँड्र्यू जॉनसन आणि 20 व्या शतकात बिल क्लिंटन यांच्या महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. तर 21 व्या शतकात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली. दरम्यान यापूर्वीच्या दोन राष्ट्राध्यक्षांवर त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात महाभियोगाचा प्रस्ताव आणला होता. तर ट्रम्प यांच्या पहिल्याच कार्यकाळात महाभियोगाचा प्रस्ताव आणला.