Home | International | Other Country | America,France, Britain uniting against China

चीनशी 50 तास खल; ऐकले नाही तर खुली चर्चा होणार

वृत्तसंस्था | Update - Mar 17, 2019, 12:52 PM IST

मसूद अझहर प्रकरण अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनचे पुढचे आक्रमक पाऊल

 • America,France, Britain uniting against China

  वॉशिंग्टन- अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी चीनचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विशेषाधिकाराचा वापर केल्यानंतर ५० तासांपासून चीनसोबत चर्चा सुरू आहे. परंतु एवढा खल करूनही चीनने ऐकले नाही तर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन हे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मसूूदच्या विरोधात खुल्या चर्चेचा प्रस्ताव आणतील. त्यावर महासभेत मतदान होईल. महासभेत सर्व १९३ सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन प्रस्तावाच्या भाषेवरही चीनशी चर्चा करत आहेत. तिन्ही देश विनाविलंब प्रस्ताव मांडतील. बहुदा हा प्रस्ताव पुढल्या आठवड्यात मांडला जाऊ शकतो. प्रतिबंधात्मक समितीची आंतरिक चर्चा गोपनीय ठेवली जाते. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर चीन या वेळी पूर्वीच्या तुलनेत अधिक सहकार्य करू लागल्याचे म्हटले आहे.


  तीन देशांनी चीनशी चर्चा केलेले तीन मुद्दे
  प्रस्तावाची भाषा
  चीनने ऐकले पाहिजे,
  असा प्रस्तावाचा मसुदा


  प्रस्तावाच्या भाषेवर चर्चा झाली. त्यानुसार चीनला आक्षेप नसेल, असा त्याचा मसुदा असेल. त्याबरोबर मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले जाईल. त्यात चीनने काही मुद्द्यांवर बदल सुचवला होता. त्यात भाषेचा समावेश होता. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स त्यावर विचार करू लागले आहेत.


  भारताने सुनावले, दहशतवादाबद्दल गंभीर असाल तर दाऊद, सलाहुद्दीनला सोपवा
  पाकिस्तान दहशतवादाच्या उच्चाटनासाठी एवढाच गंभीर असेल तर त्याने दाऊद इब्राहिम व सईद सलाहुद्दीनला भारताकडे सोपवले पाहिजे. तसे केल्यास पाकचे उद्दिष्ट जगाला लक्षात येऊ शकेल, असे भारताने स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या मते, भारताने पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया कशा प्रकारे सुरू आहेत, याचे दस्तऐवज व तपशील पाकिस्तानला दिले आहेत. त्याविषयी काही शंका असल्यास त्याची पडताळणी इतर कोणत्याही देशाकडून करण्यास आमची हरकत नसल्याचे भारताने सांगितले आहे. जैश-ए-मोहंमदसह इतर अनेक दहशतवादी संघटनांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरला. म्हणूनच पाकिस्तानला खरोखरच दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याची इच्छा असल्यास भारताच्या चिंतेचाही पाकने विचार केला पाहिजे. त्यासाठी पाकने दाऊद, सलाहुद्दीन आणि इतर दहशतवाद्यांना भारताकडे सोपवले पाहिजे. पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.  १४ देशांची साथ
  अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने चीनला स्पष्ट सांगितले की, प्रतिबंध समिती मसूदप्रकरणी मुळीच गप्प नाही. ती भारतासोबत सातत्याने विचारविनिमय करू लागली आहे. मसूदच्या विरोधात अचूक अहवाल आणण्याच्या तयारीत आहे. त्यास १४ देशांचे सहकार्य मिळाले आहे.  मग पर्यायावर विचार करता येऊ शकेल
  अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने चीनशी मसूद मुद्द्यावर चर्चेची अपेक्षा व्यक्त केली आहे. दहशतवादविरोधी लढाईत साथ दिल्यास इतर पर्यायांचाही विचार करू, असे आश्वासन तिन्ही देशांनी चीनला दिले. तुलनेत चीन जास्त अनुकूल वाटू लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Trending