Home | International | Other Country | American army nurse Tammy become Jain monk

इराकमधील हिंसाचार पाहून अमेरिकी लष्करातील नर्स टॅमी बनल्या जैन साध्वी, आता तस्करी रोखण्याचे कार्य

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 08:13 AM IST

जैन साध्वी झालेल्या पहिल्या अमेरिकी महिलेची कथा

 • American army nurse Tammy become Jain monk

  अमेरिका- २००५ ची घटना आहे. अमेरिकी लष्करात परिचारिका म्हणून इराकमध्ये काम करत होते. जखमी अमेरिकी जवानांवर उपचार करणे हे माझे काम होते. मी अनेक अमेरिकी जवानांना अपंगत्व आल्याचे व मृत्युमुखी पडताना पाहिले. एक दिवस ताफ्यासोबत छावणीत येत होते. अचानक रस्त्याच्या बाजूला स्फोट झाला. सर्व रक्ताने माखले होते, एकाचा मृत्यू झाला. मी ताफ्यात नव्हते. असले असते तर त्याला वाचवले असते. त्या जवानाच्या अंत्यविधीवेळी खूप वेदना झाल्या. त्या दिवशी एका नव्या सत्याला मी सामोरे गेले. अहिंसेचे महत्त्व समजले. हिंसाचार खूप कठोर व बीभत्स असतो हे अनुभवले हाेते. हिंसा माझे मनही निष्ठुर करत होती. मला वाटले हिंसाचार व मृत्यू सर्वसामान्य होत जाणे हा मानवतेसाठी सर्वात मोठा अाजार आहे. इराकमध्ये मी निरपराध मुले, महिला, युवक व वृद्धांच्या पार्थिवांमध्ये अन्नपाण्याचा शोध घेताना दिसले. अशा परिस्थितीत लहानपणीपासून उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या कल्लोळामुळे मन आणखी विचलित झाले. उदाहरणार्थ, मी कोण आहे? ईश्वर कोण आहे? सत्य काय आहे? माझ्या आईचे अकाली निधन का झाले? माझे वडिलांशी जमत का नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी लहानपणी चर्चमध्ये सेविका झाले होते. मात्र, माध्यमिक शिक्षण घेताना जाणीव झाली की, अशा पद्धतीने उत्तरे मिळणार नाहीत. यानंतर अनेक आध्यात्मिक व्यक्तींना भेटले. एका मित्राने आचार्य श्री योगीश यांची भेट घडवली. त्यांची भेट होऊन ४ महिनेच झाले होते, तोच मला इराकला जावे लागले. इराकमध्ये १६ महिने कर्तव्य बजावून अमेरिकेला परतल्यावर बॅचलर इन कम्युनिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला. यासोबत मी अहिंसेचे पालन सुरू केले. शाकाहार स्वीकारला. २४ व्या वर्षी मी दीक्षा घेतली. आचार्य श्री योगीश यांनी मला साध्वी सिद्धाली श्री नाव दिले. आता अहिंसा व मानवी तस्करीवर माहितीपट तयार करत आहोत. मानवी तस्करी रोखणारे कदाचित आम्ही पहिले जैन भिक्षू आहोत.


  टॅमी हर्बेस्टर, जैन साध्वी
  टॅमी हर्बेस्टर जैन साध्वी होणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला आहेत. त्यांचा कॅथोलिक कुटुंबात जन्म झाला होता. २००८ मध्ये आचार्य श्री योगीश यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्या आता साध्वी सिद्धाली झाल्या आहेत. मानवी तस्करी रोखण्यासाठी त्या काम करतात.तस्करांच्या तावडीतून सुटका झालेल्यांना समाजप्रवाहात सामावून घेण्यासाठी त्या काम करत आहेत. साध्वी होण्याचा प्रवास त्यांच्याच शब्दात...


  महावीर जयंतीदिनी अहिंसा अंक यासाठी

  २६१८ वर्षांपूर्वी जन्मलेल्या भगवान महावीर यांनी जगाला सत्य व अहिंसेचे महत्त्व सांगितले होते. या गुणांनाच त्यांनी जीवनशैली बनवले व कोट्यवधी लोकांना प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, अहिंसा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. हिंसेने कधीच कोणाचे दु:ख दूर करता येत नाही. त्यामुळेच आज भगवान महावीर यांच्या जयंतीदिनी दैनिक दिव्य मराठीत हिंसेचा उल्लेख असणाऱ्या वा हिंसादर्शक बातम्या आणि छायाचित्रे नसतील.


Trending