आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची नववधु मंत्र म्हणत असलेल्या भटजींना म्हणाली- इंग्रजीत ऐकायची आहेत लग्नाची 7 वचने, नंतर स्पतपदी घेऊन या जागेवर कपल गेले फिरायला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा- ब्रजला फिरण्यासाठी आलेल्या परदेशी युवतीला येथील एका भारतीय युवकावर झाले प्रेम. दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले, त्यामुळे सगळी तयारी झाली, मंडप टाकला. आता भटजी मंत्र म्हणत होते तेवढ्यात युवती म्हणाली- लग्नाचे 7 वचन इंग्रजीत ऐकाययये आहेत, तेव्हा नववधुला इंग्रजीत लग्नाची 7 वचने समजवण्यात आली. जाणून घ्या पूर्ण गोष्ट....


तीन महिन्यांपूर्वी आली होती भारतात

- अमेरिकेतील राहणारी क्रिश्चियन युवती ईवी तीन महिन्यांपूर्वी ब्रजला फिरायला आली होती. एक महिन्यांपूर्वी तिची ओळख महाराष्ट्रातील अहेमदनगरमध्ये राहणाऱ्याया महेश मौर्यसोबत झाली, जो अंदाजे 6 वर्षांपासून राधाकुंडमध्ये राहून तेथे भजन गातो.
- फार्मेसी केलेल्या महेशने ईवीला ब्रज दर्शन करवले, त्या दरम्यान त्या दोघांन एकमेंकांना प्रेम झाले. ईवीनी सांगितले की, तिला भारतीय संस्कृती इतकी आवडली की, तिने भारतीय मुलासोबत भारतीय पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले.
- शुक्रवारी महेश-ईवी नव दाम्पत्याच्या पोशाखात मंदिरात गेले. आचार्य ब्रजकिशोर गोस्वामी यांनी लग्नाचे सगळे विधी केले आणि दाम्पत्याने अंगठी घातली आणि एकमेंकांच्या गळ्यात हार घातला.


वधुला इंग्रजीत ऐकवली लग्नाची 7 वचने

- मथुराच्या राधाकुंड स्थित राधा माधव मंदिरात अग्नीला साक्षी माणून सप्तपदी घेतली जाणार होती, त्याआधी वधुने हे 7 वचन इंग्रजीत सांगण्यास सांगितले. 
- तेव्हा महेशने वधुला सगळी वचने इंग्रजीत सांगितली. त्यानंतर महेशने ईवीच्या भांगेत कुंकू भरून सप्तपदी घेतली. यावेळी हे दोन संस्कृतीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.


गिरिराजजीच्या परिक्रमेसाठी निघाले कपल
- या दरम्यान महेशची आई रंजना, वडील पोपट राव, मामा संतोष आणि काका बाबाजी उपस्थित होते. वीजा न मिळाल्यामुळे ईवीची आई लग्नाला नाही येउ शकली. पण त्या लवकरच येणार असल्याचे महेशने सांगितले.
- ईवी अमेरिकेच्या मायामी शहरात राहणारी आहे आणि ती एक योगा टीचर आहे, ती एक वर्षांचा वीजा घेऊन भारतात आली होती. लग्नानंतर हनीमूनला जाण्याऐवजी दोघे गिरिराजजीच्या परिक्रमेला निघाले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...