आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात अमेरिकेची कॉपी सुरू; एआयसारख्या आवश्यक बाबीसाठी डेटा उपलब्ध नसल्याचे समोर आले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, एआयवर संशोधन करत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून डेटाच मिळत नाही. विद्यार्थ्यांना अमेरिकी डेटावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच सध्या भारतात एआयच्या बहुतांश प्रकल्पांत अमेरिकेच्या प्रकल्पांची कॉपी होत आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अभ्यासानुसार एआय आधारित अभियांत्रिकी आणि उद्योग वस्तू तयार करण्यात भारताचे स्थान तिसरे आहे. एआय वस्तूंत अमेरिकेचा २५ टक्के, चीनचा २३ टक्के आणि भारताचा १९ टक्के वाटा आहे. रोबोटिक्स तज्ज्ञ आणि एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मनथा यांनी सांगितले की, डेटा दोन प्रकारे गोळा होतो-एक म्हणजे मॅन्युअल म्हणजे एखाद्या यंत्राच्या मोजणीद्वारे आणि दुसरा सेन्सरने. आपल्याकडे दोन्ही डेटा योग्य पद्धतीने मिळत नाही. 

 

एआयमध्ये संपूर्ण काम डेटाचेच आहे. अमेरिकेच्या तुलनेत आपल्याला १० टक्क्यांपेक्षाही कमी डेटा उपलब्ध होतो. सरकारला जर एआय आणखी चांगले करायचे असेल तर आपल्याकडील अनेक माहिती सार्वजनिक करावी लागेल. ट्रिपल आयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि एआयचे तज्ज्ञ राजीव संगल यांनी सांगितले की, सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग खूप सामान्य गोष्टींसाठी होत आहे. उदा. एखाद्या ग्राहकाने निळ्या रंगाचे शर्ट खरेदी केले तर त्याला कोणती पावडर विकावी. अशा वापराने आपले काहीही भले होणार नाही. एआय कुठलाही नवीन गोष्ट करत नाही, तर फक्त जुन्या गोष्टींना आणखी चांगले केले जाते. जर डेटा उपलब्ध असेल तर एआयद्वारे अनेक प्रकारची कामे केली जाऊ शकतात. 

 

एका ऑटोमोबाइल कंपनीच्या इमर्जिंग टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन टीमच्या प्रमुखाने सांगितले की, एमआयवर जास्त काम करता येऊ शकेल एवढी आपली सध्याची शैक्षणिक यंत्रणा विकसित झालेली नाही. त्याशिवाय देशात जेवढे एआयचे प्रकल्प होत आहेत ते अमेरिकेच्या प्रकल्पांची कॉपी असतात. उदाहरणार्थ तेथे चालकरहित कारवर काम सुरू आहे. या प्रकल्पाला तेथे यश मिळण्याचे कारण हे आहे की तेथे चालकाचे वेतन खूप जास्त आहे आणि त्यापेक्षा कमी गुंतवणुकीत कंपन्या चालकरहित कार तयार करत आहेत. पण आपल्याकडे कामगार किंवा चालक सहज आणि स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यामुळे चालकरहित कारच्या प्रकल्पाची आपल्याकडे सध्या गरज नाही. अशाच प्रकारे जपानमध्येही रोबोट्सद्वारे काम करवून घेतले जाते, कारण तेथे कामगारांचे वेतन खूप जास्त आहे. इस्रोच्या संवाद विभागाचे प्रमुख विवेक सिंह यांनी सांगितले की, इस्रोचे उपग्रह किंवा प्रक्षेपक सर्व काही मानवी हस्तक्षेपाविना १०-१५ वर्षे काम करतात. अर्थात त्यावर जमिनीवरून नियंत्रण ठेवले जाते आणि सर्व कामे यंत्रांद्वारे संचालित केली जातात. हे सर्व काही सेन्सॉर, रडार आणि आयसी मार्केट यांसारख्या यंत्रांद्वारेच होते. त्याला आपण एआय म्हणतो. 

 

भारतात एआयद्वारे बदलू शकतात या गोष्टी 
- एआयद्वारे डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून फ्लड प्रेडिक्शन शक्य. 
- कुंभमेळ्यासारख्या जागी गर्दीचे व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यासाठी खूप डेटाची गरज भासेल. 
- २२ भारतीय भाषांचा परस्पर अनुवाद शक्य.सध्या गुगलकडे प्रकाशन गुणवत्ता नाही. तीत मानवी पद्धतीने संपादन करावे लागते. 
- एआयच्या मदतीने आपोआप वाढणारे अवयव तयार केले जाऊ शकतात. ते शरीरात आपोआप येतील. 
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाचे संचालक डॉ. मोहित गंभीर म्हणाले, एआय कृषी क्षेत्रात योगदान देईल. 

 

मात्र यामध्ये अशा आहेत अडचणी 
- एआय बहुतांश आयआयटी व एनआयटीमध्ये एक विषय म्हणून शिकवला जात आहे. ट्रिपल आयटी हैदराबादच एआयचा हब आहे. येथे २० एआय फॅकल्टी आहेत. 
- सर्वात मोठी अडचण फंड आणि डेटा गोळा करण्यात आहे. एक जीपीयू(ग्राफिक प्रोसेसिंग युनिट) संगणक एक - कोटी रुपयांवरून २० कोटींपर्यंत येतो. हा देशातील खूप कमी संस्थांकडे आहे. 
- आपल्या देशात अनेक वस्तू दस्तऐवज किंवा डेटाच्या स्वरूपात ठेवले जात नाही. 
- अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम अद्ययावत केला जाणे आवश्यक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...