आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनी शस्त्रांमध्ये गुणवत्तेचा अभाव, सौदा करताना लाच देत असल्याचा अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या मालाप्रमाणेच आता त्यांनी बनवलेल्या शस्त्रांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शस्त्रे बनवण्याच्या शर्यतीत चीन खूप वेगाने धाव घेत आहे, परंतु अलीकडेच, चीनच्या लष्करी शस्त्रांमध्ये गुणवत्तेचा अभाव राहत असल्याचा दावा अमेरिकेच्या तज्ञाने केला आहे. शस्त्रांच्या विक्रीच्या बाबतीत चीन आता जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत फक्त अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी चीनच्या पुढे आहेत. करार मिळवण्यासाठी लाच देण्याचा आणि करार झाल्यानंतर हेरगिरीचा आरोपही चीनवर करण्यात आला आहे. वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमात अमेरिकेचे राजकीय-सैन्य व्यवहारांचे सहायक  सचिव  कूपर यांनी चिनी आणि रशियन शस्त्र उत्पादकांवर जोरदार टीका केली.  कूपर म्हणाले की,  सौदा पक्का झाल्यांनतर चीन ग्राहकाचा  फायदा घेतो. एवढेच नव्हे तर तेथे हेरगिरीचेही काम करतो, असे सांगत कूपर यांनी जगातील शस्त्रे खरेदीदारांना सावधदेखील केले आहे. कूपर म्हणाले की सत्य जगासमोर आहे. जॉर्डनने २०१६ मध्ये चीनकडून ६ मानवरहित लढाऊ हवाई वाहने (यूसीएव्ही) खरेदी केली. जॉर्डनचे हवाई दल विमानांच्या कामगिरीवर तीन वर्षानंतर खूष नाही. यामुळे जॉर्डनमध्ये विमानांना निवृत्त केले जात आहे. चीनने सीएच- ४ यूसीएव्हीला अल्जेरिया, इजिप्त, सौदी अरेबिया, इराक आणि यूएईला विकले आहे. इराकचे सैन्य दहापैकी केवळ एक विमान वापरत आहे. बहुतांशी देश देखभाल-दुरुस्तीबाबत तक्रारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...