• Home
  • Hollywood
  • 'American Factory' nominated for Best Documentary, producer Barack Obama congratulated the team

ऑस्कर / बेस्ट डॉक्यूमेंट्री कॅटेगरी नॉमिनेट झाला ‘अमेरिकन फॅक्टरी’, निर्माते बराक ओबामा यांनी केले टीमचे अभिनंदन

यशामुळे आनंदी झालेल्या ओबामांनी मेकर्स आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2020 05:06:20 PM IST


हॉलिवूड डेस्कः 92 व्या अकादमी अवॉर्ड्सची नामांकनं जाहिर झाली आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट डॉक्युमेंट्री कॅटेगरीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रॉडक्शनच्या 'अमेरिकन फॅक्टरी'ला नामांकन मिळाले आहे. या यशामुळे आनंदी झालेल्या ओबामांनी मेकर्स आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

'अमेरिकन फॅक्टरी' नामांकन मिळाल्याचा मला आनंद झाला. संपूर्ण टीम आणि चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदन', या शब्दांत ओबामा यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

हायर ग्राऊंड प्रॉडक्शन्स बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांची कंपनी आहे. कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससह भागीदारी केली आहे. खास गोष्ट म्हणजे 'अमेरिकन फॅक्टरी' हा त्यांच्या प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये आयोजित रिव्हर रन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'अमेरिकन फॅक्टरी' ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला होता.

'जोकर'ला सर्वाधिक नामांकनं
टॉड फिलिप्स दिग्दर्शित 'जोकर'ला सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक अशा मोठ्या श्रेणीत हा चित्रपट नॉमिनेट झाला आहे. लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 9 फेब्रुवारीला हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

X
COMMENT