आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन फुटबाॅलपटू कार्सनला डावा हात नाही, अडीच वर्षीय जाेसेफची घेतली भेट; साेशल मीडियावर काैतुक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅराेलिना - अमेरिकन २५ वर्षीय फुटबाॅलपटू कार्सन पिकेट ही प्राेफेशनल खेळाडू आहे. क्लब फुटबाॅल टीम आॅरलंड प्राइडकडून ती खेळते. डिफेंडरच्या पाेझिशनमधील तिची मैदानावरची कामगिरी सातत्याने वाखाणण्याजाेगी ठरते. तिने आतापर्यंत ९५ क्लब सामन्यांत आपले नशीब आजमावले. मैदानावर प्रचंड वेगाने खेळणाऱ्या कार्सनला डावा हात नाही. हाताच्या काेपऱ्याच्या खालील भाग हा एका अपघातामध्ये तिला गमावावा लागला. 


साेमवारी आॅरलंड प्राइड आणि स्काय ब्ल्यू टीम यांच्यात रंगतदार सामना झाला. खेळत असताना तिच्या नजरेस अडीच वर्षांचा जाेसेफ पडला. त्यालाही एक हात नाही. आपल्यासारख्याच असलेल्या जाेसेफला पाहताच तिचा ऊर भरून आला. माया आणि वात्सल्याची भावना जागृत झाली. सामन्याच्या ब्रेकदरम्यान तिने क्षणाचाही विलंब न करता लगेच त्या चिमुकल्या जाेसेफची भेट घेतली. यासाठी तिने क्षणार्धात स्टँड गाठले. धावत-पळत तिने त्याच्याकडे झेप घेतली. दाेघांच्या या भेटीने सर्वांचे डाेळे पाणावले. 


माझ्यातल्या उणिवांच्याही एक पाऊल पुढे : कार्सन 
मुझे लहानपणीच मला माझ्यात असलेल्या एका उणिवेची जाणीव झाली हाेती. हात नसल्याने मला सातत्याने अनेक संकटे आणि अडचणींचा नित्यनेमाने सामना करावा लागत हाेता. स्वत:साठी काही करण्यापासून मैदानावरील खेळातही मला अनेक अडचणी येत राहिल्या. मात्र, ही उणीव मला आयुष्यभरासाठी साेबत आहे. त्यामुळेच मी याचा विचारच करणे साेडून दिले. हीच उणीव माझी शक्ती बनवण्याचा मी निर्धार केला. त्याच पद्धतीने आणि मार्गाने मी मार्गस्थ झाले. याच्या सारख्या मुलांना फुटबाॅलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. युवांना माझे नेहमीच प्राेत्साहन असेल. हाच वात्सल्य आणि ममतेचा क्षण, अनेक छायाचित्रकार, चाहत्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. त्यानंतर साेशल मीडियावरही हा फाेटाे क्षणभरात व्हायरल झाला. याला चाहत्यांनी माेठ्या संख्येत लाइक केले. यासह हा फाेटाे स्पोर्ट॰स पिक्चर ऑफ द इयर ठरला आहे. 


'मला एक हात नाही. त्यामुळे काही कामे मला करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. मात्र, एक असे काम, जे मी चांगल्या प्रकारे करू शकतेे. ते म्हणजे आपल्यासारख्या लहान मुलांना प्रेरणा देण्याचे आहे,' अशी प्रतिक्रिया कार्सनने दिली. यामुळेच युवांच्या प्रतिभेला चालना मिळेल आणि ते प्रगती साधतील. - कार्सन पिकेट 

बातम्या आणखी आहेत...