आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानात आदिवासींनी अमेरिकी नागरिकाला बाणांनी जिवे मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ब्लेअर - अंदमान निकोबार बेट समूहांवरील जंगलांत आदिवासींनी एका अमेरिकी पर्यटकाची हत्या केली आहे. निकोबारच्या सेंटिनल बेट हे संरक्षित क्षेत्र असून तेथे बाहेरील लोकांना प्रवेशबंदी आहे. मात्र हा पर्यटक मच्छीमारांच्या मदतीने तेथे गेला होता. 


आदिवासींनी त्याच्यावर धनुष्य बाणांनी हल्ला चढवला. पोलिसांनी सात मच्छीमारांना अटक केली आहे. त्यांच्या मदतीनेच हा अमेरिकी पर्यटक या बेटांवरील जंगलांत पोहोचला होता. स्थानिक माध्यमानुसार,  अमेरिकेतील रहिवाशी २७ वर्षीय जॉन अॅलन चाऊवर अादिवासींनी बाणांनी हल्ला केल्यानंतरही  तो चालत होता. त्याच्या गळ्याला दोरी बांधून आदिवासी त्याला ओढत नेत असल्याचे एका मच्छीमाराने पाहिल्याचे सांगितले जाते. 

 

५५ हजार वर्षे प्राचीन जमात, अद्याप जगाशी संपर्क नाही 
सेंटिनल बेटावर जारवा आदिवासींचा नामशेष होत असलेला समुदाय आहे. त्यांची एकूण लोकसंख्या केवळ ४० इतकी आहे. या टोळीचा बाहेरील जगासोबत कोणताही संपर्क नाही. तेथे येणाऱ्यांवर ते हल्ले करतात. ही जमात बाहेरील लोकांना आपल्याशी संपर्क ठेऊ देत नाही आणि स्वत:ही बाहेरील लाेकांशी कोणताही संपर्क ठेवत नाही.  तथापि, ही हत्या याच जमातीच्या लोकांनी केल्याचे अद्याप स्पष्ट नाही. जारवा आदिवासी मानवी सभ्यतेच्या सर्वात प्राचीन जमातींपैकी एक आहेत. ते हिंद महासागराच्या बेटांवर तब्बल ५५ हजार वर्षांपासून राहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...