आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत लोक मूले गमावण्याच्या वेदनेतून एकत्र; शाळांमधील गोळीबाराच्या घटनांमुळे मृत मुलांचे आई-वडीलच बनले एकमेकांचे आधार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका- मिशेल ड्वोरेट व मेलिसा विली यांनी कधी एकमेकांना भेटले नाहीत. ना त्यांच्यात कोणते साम्य आहे. मिशेल फ्लोरिडात रिअल इस्टेट एजंट तर मेलिसा दक्षिण मेरीलँडमधील एका लहान शहरात गृहिणी आहेत. दोघांचीही मुले शाळेतील स्विमिंग टीमचे सदस्य होती हा त्यांच्यातील समान धागा. आता दोन्ही मुले या जगात नाहीत. मिशेल यांचा १७ वर्षीय मुलगा निकोलसचा फेब्रुवारीत फ्लोरिडातील मारजोरी स्टोनमॅन डग्लस हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबरात मृत्यू झाला. गोळीबाराच्या अन्य घटनांत मृत्युमुखी पडलेल्या काही बालकांच्या आई-वडिलांनी मिशेल यांच्याशी संपर्क साधला. या निमित्ताने एकमेकांना आधार देऊन बळ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. महिनाभरानंतर एक हजार किमी अंतरावरील ग्रेट मिल्स हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याने मेलिसाची १६ वर्षीय मुलगी जेलिनला ठार केले. मिशेलला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर मेलिसाशी संपर्क साधला. 

 

अमेरिकाभर एका अदृश्य दोरखंडाच्या जाळ्याने शेकडो व्यथित पालकांना एकत्र आणले आहे. यात कोणती संघटना नाही की कोणती यादी. मात्र, त्यांच्यात बळकट नातेसंबंध निर्माण झाले आहेत. सर्व जण या गटाला क्लब म्हणवतात. एक दिवस तुम्ही मुलाला शाळेत पाठवता व त्यानंतर त्याला/तिला कधीच पाहत नाही. कारण एका गोळीने आपल्या मागे व्यथा, वेदनेचा सागर तयार केलेला असतो. असे दु:ख भोगलेल्या पालकांना क्लबचे सदस्यत्व मिळते. या संदर्भात निकोल हॉकले म्हणाल्या, हा असा क्लब आहे,ज्याचे सदस्य मिळावे अशी अपेक्षा तुम्ही आयुष्यभर करत नाही. मात्र, एकदा तुम्ही यात आल्यानंतर कायम राहाल. त्यांचा ६ वर्षांचा मुलगा डाइलानचा डिसेंबर २०१२ मध्ये कनेक्टिकटमधील सेंडी हुक एलिमेंटरी स्कूलमध्ये गोळीबारात मृत्यू झाला हाेता. 

 

डायलानच्या मृत्यूच्या महिनाभरानंतर शाळेतील गोळीबारात मृत मुलांचे पालक निकोल यांच्या शहरात दाखल झाले. निकोल सेंडी हुक स्कूलमध्ये मारल्या गेलेल्या मुलांची यादी तयार करून फाउंडेशन स्थापण्याच्या प्रयत्नात होते. या लोकांत कोलोरॅडोहून आलेल्या बाॅब वीस यांचाही समावेश होता. त्यांची मुलगी व्हेरोनिका व अन्य पाच जणांची २०१४ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील सांता बार्बरामध्ये झालेल्या गोळीबारात हत्या झाली होती. सर्व जण मुलांच्या पुण्यतिथीला एकमेकांना संदेश पाठवून आठवणी जागवतात. 

 

फसवणूक व कटकारस्थान 
मुलीच्या हत्येनंतर सेंडी फिलिप्स व त्यांचे पती लोनी यांनी पीडित लोकांच्या मदतीचे कार्य हाती घेतले. त्यांनी आपली मालमत्ता विकून भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांनी सरव्हायव्हर्स एम्पाॅवर्ड संस्था स्थापन केली असून पीडित कुटुंबांना जोडत आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर वेबसाइट तयार करून मुलांच्या मदतीचा दावा करणाऱ्या बनावट लाेकांपासून सावध राहण्याचे आवाहन ते करतात. सेंडी म्हणाल्या, दु:खी पालकांना गन कंट्रोल संघटनांकडून पैसे घेणारा 'क्रायसिस अॅक्टर' बनवणाऱ्या लोकांकडून सावध राहिले पाहिजे. 

 

सरकारकडे विश्वासार्ह आकडेवारी नाही 
अमेरिकी सरकारकडे शाळेतील गोळीबाराच्या घटनांची विश्वासार्ह आकडेवारी नाही. टाइम मासिकाने गन सेफ्टी आर्गनायझेशन एव्हरीटाऊनमधून डेटा घेतला आहे. यामध्ये डिसेंबर २०१२ नंतर शाळांत झालेल्या घटनांत एक जण मारला किंवा जखमी झाला आहे. प्रत्येक प्रकरणात मृत किंवा जखमी विद्यार्थी, शिक्षक किंवा हल्लेखोर होता. 

 

नैराश्याची भावना 
अशा घटनानंतर कुटुंबामध्ये उद्ध्वस्त झाल्याची भावना सामान्य आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडील नैराश्याने ग्रासले जातात. कुटुंबे उद्ध्वस्त होतात. जिवंत मुले दीर्घकाळ भीतीच्या सावटाखाली असतात. 

बातम्या आणखी आहेत...