आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • American Prostatic Expert Did Make Up Of Amitabh Bachchan To Give Lakhnavi Mirza's Look, For One Day Fee Rs 1.5 Lacs

अमिताभ यांना लखनवी मिर्जाचा लुक दिला अमेरिकी प्रोस्थेटिक एक्सपर्टने, एका दिवसाची फीस आहे दीड लाख रुपए 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'गुलाबो सिताबो' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. तो फोटो समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या पात्राविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अमिताभ एका मुस्लिम वृद्धाची भूमिका साकारणार आहे. या पात्रासाठी कशी तयारी केली जात आहे, अमिताभ यांना किती मेहनत घ्यावी लागत आहे, याची सर्व माहिती आम्ही दिव्य मराठीच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. 
असे आहे अमिताभ यांच्या पात्राचे स्केच 

 

या प्रोजेक्टशी जोडलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार... 
या चित्रपटात ते लखनऊमधील टिपिकल सुन्नी मुसलमानाची भूमिका करत आहेत. खऱ्या जीवनात मुस्लिम वृद्ध कसे असतात, त्याचा आधार घेऊनच पात्राचे मेकअप आणि गेटअप तयार करण्यात आले आहे. त्यांना हा लूक देण्यासाठी आणि त्यांचे नाक मोठे दाखवण्यासाठी अमेरिकेवरून तज्ञ महिला प्रोस्थेटिक बोलावण्यात आली आहे.

 

लेखक जुही चतुर्वेदीची होती ही कल्पना...  
मिर्झा साहेबांच्या या लूक आणि गेटअपचे व्हिजन लेखक जुही चतुर्वेदी यांचे होते. जुहीने आर्ट डायरेक्शन आणि कॉस्च्यूम टीमला लूकविषयी बेसिक माहिती दिली होती. त्याचा आधार घेऊनच डझनभर लूक तयार करण्यात आला होता. नंतर टीमला हाच लूक आवडला. जुहीनुसार, मिर्झा साहेब आतून दु:खी, खचलेले आणि वरून हसऱ्या चेहऱ्याचे हवे होते. 

 

लूकची सखोल माहिती...  
- 1.5 लाख रुपये रोज दिले जात आहेत तज्ञाला 
 -03 तास लागतात फक्त नाकाच्या मेकअपला 
- 01 डझनभर लूक टेस्ट करण्यात आले. 

 

जीवन...  
िमर्झा साहेबांची लखनऊमध्ये एक मोठी हवेली असते. त्यात अनेक भाडेकरू राहतात. मिर्झा साहेबांसाठी तेच एक छोटे कुटुंब असते. त्यापैकी एक भाडेकरू आयुष्मान खुराणादेखील असतो. 

 

दाढी-मिशा, आयब्रो...  
ग्लू फाउंडेशनने दाढी-मिशाचे स्किन पॅच तयार केले आहे. यासाठी अनेकदा टेस्ट करण्यात आली. 

 

चष्मा... 
डोळे मोठे दिसतील असा चष्मा वापरण्यात येणार आहे. 

 

कपाळाच्या अठ्या... 
फोम लेटेक्स आणि सिलिकॉनच्या मदतीने त्यांच्या कपाळावर अठ्या दाखवण्यात येईल. 

 

नाक... 
त्यांच्या या लूकमध्ये त्यांची मोठी, लांबलचक नाकच महत्त्वाची आहे. स्कल्पचिंग, मॉडेलिंग आणि कास्टिंगने नाकाचा शेप तयार करण्यात आला आहे. नंतर प्रोस्थेटिक एलिमेंट जिप्सम, लेटेक्स आणि जिलेटिन आदींनी नाक रोपण्याचे काम केले जाते. 

 

पाेशाख...  
- पारंपरिक मुस्लिम व्यक्तीच्या पाेशाखात दिसतील. 
- पूर्ण चित्रपटात पांढऱ्या पोशाखात दिसतील. 
- ट्रेडिशनल मुस्लिमांसारखे दिसण्यासाठी अाखूड पायजामा घालतील. 
- त्यांच्या डोक्यावर मफलर आणि टोपी असणार आहे. 

 

व्यक्तिमत्त्व...  
- मिर्झा साहेब तत्त्वनिष्ठ मुसलमान आहेत. 
- स्वत:पेक्षा इतरांच्या अडचणी सोडवताना दिसतात. 
- आयुष्यात त्यांनी बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. 
- ते एक पारंपरिक सुन्नी मुसलमान आहेत. 
- पाच वेळेचे नमाजी आहेत. 

 

यांची मेहनत...  
खरं तर, प्रॉस्थेटिकचे काम अमेरिकी तज्ज्ञांकडूनच करुन घेतले जात आहे. त्यांचे हे कृत्रिम नाक लावण्यासाठी त्यांना रोज तीन तास लागतात. सूत्राच्या माहितीनुसार, अमिताभ यांना हा लूक देण्यासाठी सेटवर त्यांचा वैयक्तिक मेकअपमन दीपक सावंत देखील उपस्थित राहतो. 

 

बॉडी लँग्वेज...  
- कमरेतून वाकलेले असतील. 
- थोडे रागीट दिसतील 
- प्रत्येक गोष्टीला न्याहाळून पाहताना दिसतील. 

बातम्या आणखी आहेत...