Home | Party | American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos

New Wedding Photos : हिंदू पद्धतीने झालेल्या प्रियांका-निकच्या लग्नाचे नवीन फोटोज आले समोर, रेड कलरच्या लहेंग्यात सुंदर दिसली पीसी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:26 PM IST

दुसरे रिसेप्शन मुंबईत 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. हे रिसेप्शन प्रियांका तिच्या बॉलिवूड फ्रेंड्ससाठी ठेवत आहे.

 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos


  बॉलिवूड डेस्कः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 1 आणि 2 डिसेंबर रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाली. प्रियांकाच्या लग्नानंतर पीपल्स या इंटरनॅशनल मॅगझिनने तिच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. प्रियांकाने पीपल्स मॅगझिनसोबत लग्नाचे फोटो आणि व्हिडिओसंदर्भात 17 कोटींचा करार केला होता. आता हिंदू पद्धतीने झालेल्या तिच्या लग्नाचे आणखी काही नवीन फोटोज समोर आले आहेत. यामध्ये प्रियांका लाल रंगाच्या लहेंग्यात तर निक गोल्डन कलरच्या शेरवानीत दिसतोय.


  छायाचित्रांत दिसतेय वरमालाची झलक...
  - या छायाचित्रांमध्ये वरमाळा घालताना झालेली मजामस्ती दिसतेय. निकच्या मित्रांनी आणि प्रियांकाच्या मैत्रिणींनी तिला यावेळी उचलून घेतले होते. प्रियांका लग्नमंडपापर्यंत तिचा भाऊ सिद्धार्थ आणि कजिनसोबत पोहोचली होती.
  - समोर आलेल्या आणखी एका फोटोत प्रियांका पती निक जोनस, सासरे पॉल केविन, सासू डेनिस, दीर जो, जाऊ सोफी आणि जोनस कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पोज देताना दिसतेय.

  मुंबईत होणार रिसेप्शन...
  - याच आठवड्यात मंगळवारी दिल्लीत प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन पार पडले. रिपोर्ट्सनुसार, आता दुसरे रिसेप्शन मुंबईत 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. हे रिसेप्शन प्रियांका तिच्या बॉलिवूड फ्रेंड्ससाठी ठेवत आहे. या पार्टीनंतर निकयांका एका लहान हनीमूनवर जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे कपल 27 डिसेंबर रोजी हनीमूनला रवाना होणार आहे. दोघे कुठे जाणार याविषयी मात्र गुप्तता बाळगण्यात येणार आहे.

  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार प्रियांका...
  - प्रियांका चोप्राच्या आगामी 'द स्काई इज पिंक' या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अद्याप शिल्लक आहे. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग शेड्युल अहमदाबाद येथे आहे. शूटिंग संपल्यानंतर प्रियांका आणि निक लांब सुटीवर जाणार आहेत.
  - प्रियांका तिची आई मधू चोप्रासोबत 6 डिसेंबर रोजी त्यांच्या प्रॉडक्शनचा चित्रपट 'पहुना'च्या निमित्ताने सिक्किमला जाणार आहे. नेपाळी भाषेतील या चित्रपटाच्या मधू चोप्रा आणि प्रियांका निर्मात्या आहेत.


  बॉलिवूड सेलेब्सनी दिल्या निकयांकाला शुभेच्छा...
  कतरिना कैफ, आलिया भट, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अनुष्का शर्मा, भूमी पेडनेकर, प्रीती झिंटा, सोनाली बेंद्रेसह अनेक सेलिब्रिटींनी नवविवाहित दाम्पत्याला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos
 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos
 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos
 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos
 • American Singer Nick Jonas And Bollywood Actress Priyanka Chopra Hindu Wedding New Photos

Trending