आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: प्रियांका चोप्रोचा बॉयफ्रेंड निक जोनास आपल्या पालकांसोबत भारतात पोहोचला आहे. गुरुवारी संध्याकाळी तो मुंबई एयरपोर्टवर पालकांसोबत दिसला. प्रियांकाच्या घरील पार्टीसाठी निक आई-बाबांना घेऊन आला असे वृत्त आहे. खरंतर प्री-वेडिंग रिचुअल्स पुर्ण करण्यासाठी प्रियांका आपल्या कुटूंबियांना निकच्या कुटूंबियांशी भेटवणार आहे. याच कारणांमुळे निक भारतात आला आहे. या भेटीनंतर प्रियांका लवकरच साखरपुड्याची पार्टी देईल असा अंदाज आहे. प्रियांका आणि निकच्या कुटूंबियांची ही पहिली भेट असणार आहे.
निकने साखरपुड्यात घातली 1.40 कोटींची रिंग
प्रियांका चोप्रा नुकतीच डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये गेली होती. याच दरम्यानत तिची अंगठी चर्चेचा विषय ठरली. ही प्रियांकाची साखरपुड्याची अंगठी आहे असे बोलले जातेय. या डायमंड रिंगची किंमत 200,000 डॉलर(जवळपास 1.40 कोटी) आहे. डब्ल्यू पी डायमंडचे प्रेसिडेंट एंडू ब्राउन यांच्या दाखला देऊन हा दावा केला जातोय.
- काही दिवसांपुर्वीच प्रियांका भारतात परतली. तेव्हा ती रिंग काढून जीन्सच्या पॉकेटमध्ये ठेवताना दिसली होती.
जुलैमध्ये प्रियांकाने केला साखरपुडा
रिपोर्टनुसार, प्रियांकाने 18 जुलैला आपल्या 36 व्या वाढदिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला. परंतू अजूनही याची अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रियांकाने अब्बास जफरचा सलमान खान स्टारर 'भारत' चित्रपट सोडल्यापासून तिच्या लग्नाचे अंदाज बांधले जात आहेत.
- याच काळात दैनिक भास्करशी झालेल्या बातचितमध्ये प्रियांकाच्या आत्याने सांगितले होते की, "आम्ही दोघांच्या निर्णयामुळे खुप आनंदी आहोत. 18 जुलैला सर्व लोक प्रियांकाच्या घरी उपस्थित होते. यापुर्वी सर्व लोक निकच्या घरी अमेरिकेत गेले होते. लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख ठरवण्यात येईल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.