आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील सर्वात ज्येष्ठ बॉल डान्सर पॉर्सो लिंच, वय-१००; म्हणाल्या - भारतात योग शिकले, हेच रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील हार्टस्लेडल येथे राहणाऱ्या योग प्रशिक्षक पोर्सो लिंच यांनी वयाची शंभरी गाठलेली असली तरी त्यांच्या हालचालीतला उत्साह पाहता, त्या आजही थकलेल्या दिसत नाहीत. त्यांच्या जीवनाचा मूळ मंत्र खेळकर स्वभाव आणि निरोगी राहून आयुष्याची वाटचाल करत राहायची हाच आहे. चार वेळा त्यांच्यावर ढोपरे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. परंतु लिंच यांना आजही बॉलरूमध्ये डान्स करण्याची हौस आहे. लिंच यांचा जन्म भारतात झाला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा अनुकरणीय यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला आहे. ७ वर्षांच्या असताना भारतातील समुद्रकिनाऱ्यावर मुलांना योगा करताना त्यांनी पाहिली होती. तेव्हा त्यांनी योग करण्याचे ठरवले. त्यांच्या जवळच्या एका नातेवाइकाने ही आसने मुलांची आहेत, असे सांगून योगसाधनेस विरोध दर्शवला होता. परंतु मुले करू शकतात, मग मी का नाही, असा त्यांचा प्रश्न होता. यानंतर योगात त्यांनी प्रावीण्य मिळवले. लिंच यांनी किशोरवयीन असतानाच ज्यांच्या उठण्या-बसण्याची पद्धत अयोग्य होती. अशा लोकांना योग्य पद्धतीने श्वास कसा घ्यावा, हे तिने सांगण्यास सुरुवात केली होती.  लिंच यांनी सांगितले, मी लोकांना शिकवते की, फुप्फुसे पोटाखाली नव्हे तर पोटाच्या वरच्या भागात असतात. 

 

सूर्यासमोर उभे राहून मनौधर्य वाढवतात
त्या सूर्यासमोर उभे राहून आपला आत्मविश्वास वाढवते. नंतर त्याला पाहून म्हणते, आजच्या आयुष्यात येणारा सर्वात सुंदर असा दिवस आहे आणि हा दिवस खरेच खूप चांगला असतो, असे त्या सांगतात. त्यांचे बलस्थान विद्यार्थी आहेत. १३ ऑगस्ट रोजी त्या वयाची १०० वर्षे पूर्ण करत आहेत. त्या एकांतात असतात तेव्हा त्यांचे जुने आणि नवे विद्यार्थी त्यांच्यात आत्मविश्वास वाढवतात. योग शिकणारी सिल्व्हिया सेमिल्टन बेकर यांना लिंच याचे आयुष्य एक योगाचा मार्ग आहे, असे वाटते. आजही त्यांची हीच दिनचर्या कायम आहे. 

बातम्या आणखी आहेत...