आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे मुजाहिदींना प्रशिक्षण, आता दहशतवादी म्हणणे चुकीचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : अमेरिकेने दहशतवाद वाढवण्याचे काम केल्याचा आराेप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. आधी मुजाहिदीनला प्रशिक्षण दिले व आता त्यांना दहशतवादी असे म्हणणे याेग्य नसल्याचे इम्रान यांनी सांगितले. ते शुक्रवारी बाेलत हाेते. साेव्हिएत संघाच्या विराेधात अमेरिकेने मुजाहिदीनला जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण दिले हाेते. १९८० च्या दशकात मुजाहिदी लाेकांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात आले हाेते. तेव्हा त्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला हाेता. त्यामुळेच पाकिस्तानने मुजाहिदी तयार केले हाेते. त्याच्या दहा वर्षांनंतर अमेरिका अफगाणिस्तानात आले हाेते. जिहादला दहशतवाद असे म्हटले जात आहे. आता दहशतवादाच्या दीर्घ लढाईत यश न मिळाल्याने दाेषी ठरवले जात आहे. हा विराेधाभास आहे. वास्तविक आम्ही या लढाईत ७० हजार लाेकांना गमावले आहे. त्याचबराेबर १०० अब्ज डाॅलरची अर्थव्यवस्थाही गमावली, असा दावा त्यांनी केला. अमेरिका दाेषाराेप करत आहे. मला ही गाेष्टी पटली नाही. पाकिस्तानसाेबत जे काही घडले ते याेग्य नाही, असे मला वाटते.


इम्रान दोन आठवड्यात दुसऱ्यांदा मुजफ्फराबाद भेटीवर
महासभेत पहिल्यांदाच सहभागी हो
णार
इम्रान खान संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या सत्रात पहिल्यांदाच सहभागी हाेणार आहेत. त्यांचा हा दाैरा या महिनाअखेरीस आहे. या दाैऱ्यात इम्रान खान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांची दाेन वेळा भेट घेण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७४ व्या बैठकीत ते सहभागी हाेतील. त्यासाठी २१ सप्टेंबर राेजी ते न्यूयाॅर्कला रवाना हाेतील. २७ सप्टेंबर रोजी महासभेला संबोधित करतील. ट्रम्प व इम्रान यांची पहिली भेट दुपारी भोजनावेळी होईल. दुसरी चहापानाच्या वेळी होईल. इम्रान यांचा हा दुसरा दौरा असेल.

एलआेसीवर कधी जायचे हे मी जनतेला सांगेन : इम्रान खान
जम्मू-काश्मीरमधील कलम- ३७० हटवण्यात आल्यानंतर बिथरलेले इम्रान खान सातत्याने पाकव्याप्त काश्मीरचे दौरे करू लागले आहेत. शुक्रवारी ते पीआेकेतील मुजफ्फराबादच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी काश्मीरच्या नागरिकांनी एकजूट दाखवावी यासाठी एका कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा मांडणार आहे. संपूर्ण जगाला याबद्दलची माहिती देणार आहे. काश्मीर मुद्यावर मुस्लिम देशांनी पाकला समर्थन दिले नाही. भारताचे मुस्लिम देशांसोबत असलेले आर्थिक हितसंबंध हे त्यामागील कारण आहे. तुमच्यापैकी अनेकांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्या एलआेसीची गरज नाही. मी सांगेन तेव्हा एलआेसीवर जा, असे इम्रान यांनी सांगितले. आधी पाक सरकार ३० ऑगस्ट रोजी काश्मीर भेटीवर आले होते.

बातम्या आणखी आहेत...