आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत काम बंदचा विक्रम: वेतन नको, कामावर रुजू करा; अमेरिकेत हजारो कर्मचाऱ्यांची मागणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनचा तिढा सुटलेला नाही. इतिहासातील विक्रमाची या काम बंदीने बरोबरी केली आहे. याअगोदर १९९५ मध्ये १६ डिसेंबर ते ६ जानेवारी १९९६ दरम्यान २१ दिवसांपर्यंत सरकारी काम ठप्प केले होते. २२ डिसेंबर रोजी यंदा अमेरिकेत सरकारी काम व्यापक प्रमाणात ठप्प झाले. मेक्सिको सीमेवरील भिंतीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हे शटडाऊन सुरू झाले होते. सीमेवर भिंत बांधण्यासाठी सुमारे ४० हजार काेटी रुपयांच्या निधीची मागणी ट्रम्प यांनी केली. मात्र विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टीने ट्रम्प यांच्या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. त्यानंतर ४ लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्याचबरोबर आणीबाणीच्या काळातील सेवांत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनावेतन कामावर येण्याची सक्ती करण्यात आली. त्याचा परिणाम शटडाऊनचा परिणाम अंशत: होईल, असे सरकारला वाटते. त्या पार्श्वभूमीवर शटडाऊन संपवून आम्हाला कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊससमोर निदर्शने केली. या आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनाही सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांच्या हाती 'आम्हाला संप नको. काम द्या', असे पोस्टर झळकले होते.
 
काम बंदीचा व्हिसा ते अंतराळापर्यंत परिणाम 
शटडाऊनमुळे व्हिसा जारी करणाऱ्या प्रक्रियेला फटका बसला आहे. वाणिज्य, परिवहन विभागाचे ६० हजार कर्मचारी सुटीवर आहेत. त्यामुळे भारतासह इतर देशांतील निर्यातीलाही फटका बसला आहे. हा परिणाम अंतराळापर्यंत आहे. टेलिस्कोपचा कॅमेरा बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. 


मेक्सिकोच्या सीमेवर भिंतीबाबत ट्रम्प यांनी दिले होते आश्वासन 
संघटनेत सहभागी इंटर्नल सर्व्हिसचे ऑडिटर आनंद देसाई म्हणाले, राजकीय नेत्यांनी एकत्र बसून या मुद्द्यावर एक योजना आखली पाहिजे. ती सहमतीने तयार करावी. त्यामुळे किमान कामकाज सुरळीत होऊ शकेल. दुसरीकडे अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवरील भिंत बांधण्याची ग्वाही ट्रम्प यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून दिली होती. 

 

ट्रम्प कार्यकाळातील तिसरे, आतापर्यंतचे २१ वी कामबंदी 
अमेरिकेतील सर्वात जास्त शटडाऊन रोनाल्ड रिगन यांच्याकाळात ८ वेळा झाले होते. जिमी कार्टर यांच्या कार्यकाळात ५ वेळा अशी स्थिती होती. क्लिंटन यांच्या कार्यकाळात दोन तर ट्रम्प यांच्या काळात ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेतील सात मोठे ब्रेकडाऊन...

बातम्या आणखी आहेत...