Home | International | Other Country | amerika-pak-list

अमेरिकेला हवा मुंबई हल्ल्याचा सुत्रधार, मुल्ला ओमरसह 5 जणांची यादी पाकिस्तानला दिली

agencies | Update - May 28, 2011, 01:51 PM IST

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार इलियास काश्मिरीसोबत 5 दहशतवाद्यांना सोपवण्याची मागणी अमेरिकेने पाकिस्तानकडे केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तान दौऱ्यामध्ये या दहशतवाद्यांची यादी पाक सरकारकडे सोपविली आहे.

  • amerika-pak-list


    वॉशिंग्टन- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार इलियास काश्मिरीसोबत 5 दहशतवाद्यांना सोपवण्याची मागणी अमेरिकेने पाकिस्तानकडे केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तान दौऱ्यामध्ये या दहशतवाद्यांची यादी पाक सरकारकडे सोपविली आहे. अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार यादीत असलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानातच असल्याचा अमेरिकेचा दावा आहेे.
    लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने या 5 दहशतवाद्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यात लादेनच्या अतिशय जवळ असलेला अल जवाहिरी, हक्कानी नेटवक्र्सचा सिराज हक्कानी, अल कायदाचा दहशतवादी इलियास काश्मिरी, अल कायदाचा ऑपरेशन चीफ अब्दुल रेहमान आणि तहरिक-ए-तालिबानचा मुल्ला ओमर यांचा समावेश आहे. या यादीवर शुक्रवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
    पाकिस्तानमध्ये अजूनही अल कायदाचे दहशतवादी लपले आहेत, असा अमेरिकेचा दावा आहे. गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानातून 7 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. ते दहशतवादी अल कायदाचे मानले जातात. त्यापैकी एक जण डेरा गाजी खान ½ाागात एक मदरसा चालवतो. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या मागणीवर चालढकल करणे पाकिस्तानला महागात पडू शकते. लादेनला मारण्यासाठी केलेल्या कारवाईची पुनरावृत्ती होवू शकते, असा इशारा अध्यक्ष बराक ओबामा यांनी यापुर्वीच दिला आहे.

Trending