आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद: वास्तवात जे घडतं त्याच्या अनेक शक्यता असतात. त्यातील रंजक शक्यतांपासून नाटक बनतं. खरं वाटेल असं, परंतु खोटं, खोटं केलेलं असतं त्याचं नाव नाटक, अशा सोप्या शब्दांत अमेय दक्षिणदास यांनी नाट्य कार्यशाळेत नाट्यलेखन आणि अभिनय कसा करायचा हे सांगितलं. दक्षिणदास यांनी संवादी पद्धतीने नाटकाच्या अनेक मौलिक टिप्स दिल्या.
दक्षिणदास यांनी दिलेल्या टिप्स
- आभाळाएवढ्या कल्पना चिमटीत पकडून नाट्यलेखन करावे. रंजक तर्कावर आधारित लिहिलेले नाटक उत्तम बनते.
- शरीर हे आपलं टूल आहे. दुकानदार रोज जसा आपल्या दुकानातील सामानांवरील धूळ झटकतो तसे नाटकात कायम भूमिकेवरील धूळ झटकावी लागते. म्हणजे एकदा केलेली भूमिका लवकर सोडून देऊन दुसऱ्या भूमिकेसाठी सिद्ध असावं लागतं.
- आपल्यातले शारीरिक दोष भूमिकेपुरते टाळता आले पाहिजेत. उदा. रागात बोलताना एखाद्याची भुवई उडते. जर नाटकातील भूमिकेत हे अपेक्षित नसेल तर जाणीवपूर्वक ती उडणारी भुवई थांबवता आली पाहिजे.
- ऐनवेळी काही होत नाही. 'होऊन जाईल' ही मानसिकता ठेवून नाटक यशस्वी होत नाही.
रंगमंचावर विनाकारण हालचाली, चेहऱ्यावर भाव चालत नाहीत. उदा. विनाकारण एखाद्या दिशेला कलाकाराने नजर दिली तर रसिकांना त्या नजरेच्या पुढे काहीतरी असेल असे वाटते आणि प्रत्यक्षात तसे काहीच नसेल तर निराशा होते.
- करायच्या भूमिकेची देहबोली शिकून घ्या. त्यासाठी जाणीवपूर्वक एक्झरसाइज करा. ती करत असताना तुम्हाला जिथे ताण पडतो, तो ताण पूर्णपणे बंद होईपर्यंत एक्झरसाइज करत राहा. म्हणजे देहबोली हुबेहूब येऊ शकते.
- पडदा उघडल्यानंतर पहिल्या तीन, चार मिनिटांतच रंगमंचावर नेमकं काय सुरू आहे हे रसिकांना कळावं. जर जाणीवपूर्वक कन्फ्युजन ठेवायचे असेल तर ते तसे स्टँड करता आले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.