आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेय खोपकर एंटरटेन्मेंटचा झी स्टुडिओजला 'धक्का', 'दे धक्का 2'च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाचा निकाल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमेय खोपकर एंटरटेन्मेंटने झी स्टुडिओजला धक्का दिला आहे. 'दे धक्का 2' च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला असून, आता अमेय खोपकर एंटरटेन्मेंटच 'दे धक्का 2' ची निर्मिती करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?


जवळपास आठ-दहा महिन्यांपूर्वी अमेय खोपकर एंटरटेन्मेटकडून 'दे धक्का 2' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या पूर्वी 'दे धक्का' या चित्रपटाची निर्मिती झी कडून करण्यात आली होती. त्यामुळे 'दे धक्का'चे हक्क झीकडे असून, 'दे धक्का 2' ची निर्मिती अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला करता येणार नाही असे झीचे म्हणणे होते. यावरून निर्माण झालेला वाद सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन नुकताच त्यावर निकाल दिला. उच्च न्यायालयाने झीचा दावा फेटाळून 'दे धक्का 2'च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले. त्यामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला 'दे धक्का 2' या चित्रपटाची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत अमेय खोपकर म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, तसेच 'दे धक्का 2' या चित्रपटाच्या टीमचे त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी अभिनंदन करतो.

बातम्या आणखी आहेत...