Home | Khabrein Jara Hat Ke | Amezing news: Fances Island Switches Countries Every Six Months

दर सहा महिन्यांनी या बेटावरील मालकी हक्क दुसऱ्या देशाच्या ताब्यात; साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे परंपरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 02:47 PM IST

स्पेन आणि फ्रान्समध्ये आहे विचित्र करार

 • Amezing news: Fances Island Switches Countries Every Six Months

  पॅरिस- स्पेन आणि फ्रान्स यांच्या सिमारेषेच्या मधोमध 'फँसेस' नावाचे एक बेट आहे. या बेटाचे वैशिष्टे म्हणजे दोन्ही देश दर सहा महिन्यांनी या बेटावरील मालकी हक्क एकदुसऱ्याकडे सोपवतात. मागील पाच महिन्यांपासून हा बेट फ्रान्सच्या ताब्यात आहे. तर आता एक महिन्यानंतर फ्रान्स हा बेट स्पेनला परत देणार आहे. ही परंपरा जवळपास मागील 350 वर्षांपासून सुरू आहे. हा बेट फ्रान्स आणि स्पेन यांच्या सिमारेषेवरील बिदासोआ या नदीवर आहे.

  दोन देशांचे राखीव भू क्षेत्र आहे हे बेट
  > या दोन देशांना बिदासोआ ही नदी वेगळे करते. 'फँसेस' हे बेट या नदीच्या मधोमध असल्याने याला दोन्ही देशांचे राखीव भू क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले आहे.

  बेटाला अदला-बदल करण्यामागचे कारण
  > फँसेस बेटाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 1658 मध्ये फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील युद्ध मिटवण्याची चर्चा याच बेटावर करण्यात आली होती.
  > या दोन देशांतील युद्ध दोन्ही राजघराण्यातील मुलांच्या लग्नाने मिटवण्यात आले होते. फ्रान्सचे किंग लुईस चौदावे याचा आणि स्पेन देशाचे किंग फिलिप चौथे यांची कन्या या दोघांचा विवाहाने दोन्ही देशांतील वाद मिटवण्यात आला होता. त्यानंतर या बेटावर दोन्ही देशांचा मालकी हक्क असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून दरवर्षी हे बेट 1 फेब्रुवारी ते 31 जुलैपर्यंत स्पेनच्या मालकी हक्कात तर त्यानंतर पुढील 6 महिने फ्रान्सच्या मालकी हक्कात येते.

  पुढील स्लाइडवर पाहा Photos...

Trending