आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amidst Cancer Treatment Sonali Bendre Gets Anupam Kher Company During The Weekends

कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रेचा खुलासा- प्रत्येक आठवड्यात या बॉलिवूड अॅक्टरशी होते भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कँसरवर उपचार घेत आहे. तर अॅक्टर अनुपम खेरही आपली हॉलिवूड सीरीज एनबीसी न्यू एम्सटरडमची शूटिंग करत आहेत. या दरम्यान वीकेंड्सला त्यांची भेट होत असते आणि दोघांमध्ये पैंज लागली आहे की, कोण सर्वात पहिले घरी जाईल. सोनालीने याचा उल्लेख आपल्या ट्वीटमध्येही केला आहे. 


सोनालीने असे लिहिलेय
सोनाली जुलैपासून न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनालीची किमेथेरेपी सुरु आहे. ती आपले घर आणि देशाला किती मिस करते हे तिने ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे. सोनालीने लिहिले - "फक्त या शोमुळे वीकेंड्सला मला कंपनी मिळते. आम्ही नेहमी बोलत असतो की, कोण आधी घरी जाईल. मला आशा आहे की, ती मिच असेल. प्रार्थना करते की, त्यांचा सीजन अनेक सीजनपर्यंत सुरु राहावा आणि ते येथेच राहावे." सोनालीने तिला कँसर असल्याचे वृत्त 4 जुलै रोजी दिले होते. तेव्हापासून ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. 

 

गणपती उत्सवही केला मिस 
अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कँसरवर उपचार घेत होती. ती गणेश उत्सव मिस करत होती. हॉस्पिटलमधून सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये सोनालीने लिहिले होते की, "गणेश चतुर्थीचा कार्यक्रम नेहमीच माझ्यासाठी खुप जवळचा आहे. मी माझ्या घरातील गणेश उत्सव सेलिब्रेशन मिस करतेय. तरीही मला ब्लेस असल्यासारखे वाटतेय. तुम्हासर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा." या पोस्टसोबत सोनालीने आपल्या मुलाचा गणपती आरती करतानाचा फोटो शेअर केला होता.

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...