आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी सोडला होता नागराज मंजुळेंचा 'झुंड', आमिर खानच्या सांगण्यावरून सेटवर परतले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिरच्या सांगण्यावरूनच अमिताभ पुन्हा या चित्रपटात सहभागी झाले.

बॉलिवूड डेस्कः नागराज मंजुळे यांच्या आगामी 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी एक खुलासा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट सोडला होता, परंतु आमिर खानच्या मध्यस्थीने ते या प्रोजेक्टशी पुन्हा जुळले. आमिरला या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण आमिर त्यांच्या 'सैराट' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा मोठा चाहता आहे. आमिरच्या सांगण्यावरूनच अमिताभ पुन्हा या चित्रपटात सहभागी झाले.

या कारणामुळे बिग बी घेणार होते चित्रपटातून माघार
 
गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावे लागले. सतत चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलल्या जात होत्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रक बिघडले. बिग बींनी मागील वर्ष हे या चित्रपटासाठी राखून ठेवले होते. मात्र ते वेळेनुसार झाले नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केल्याची चर्चा होती. पण आमिर खानच्या मध्यस्थीनंतर आणि निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवल्याचे सूत्रांकडून समजते. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट उघड करण्यात आलेली नाही. 

ब्रेकदरम्यान मुलांसोबत केबीसी खेळायचे बिग बी  

चित्रपटाचे शूटिंग नागपुरात 45 दिवस चालले. तिथे अमिताभ यांनी मूळ झोपडपट्टीतील मुलांसह शूट केले. शूटिंग ब्रेकदरम्यान अमिताभ त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नव्हे तर मुलांसोबत वेळ घालवत असत. या ब्रेक दरम्यान ते अनेकदा मुलांसोबत केबीसी खेळत असे.
 
हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. बिग बी व्यतिरिक्त रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात असल्याचे समजते.