आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ठग्स ऑफ हिंदोस्तान\' चित्रपट अपयशी झाल्यानंतर आमिर खानने आपले सर्व प्रोजेक्ट्स ठेवले होल्डवर, चित्रपटातून घेऊ शकतो काही काळ विश्रांती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मागच्या महिन्यात दिवाळीला रिलीज झालेला चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' साठी आमिर खानने आधीच प्रेक्षकांची माफी मागितली आहे. हा चित्रपट तितकासा यशस्वी झाला नव्हता. आता आमिर खान मेगाबजट फिल्म 'महाभारत' च्या तयारीत गुंतला आहे आणि यासाठी तो रिसर्चही करत आहे. मात्र तीन, चार प्रोजेक्ट असे आहेत, ज्यामध्ये आमिर काम करण्याची अशा आहे मात्र त्याने सर्वानाच सध्या होल्डवर ठेवले आहे. यामागे सर्वात मोठे कारण 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' चे अपयश आहे की, दुसरे काही हे अजूनही स्पष्ट नाही. 

 

आमिरचे हे प्रोजेक्ट्स आहेत होल्डवर...
1 - फिल्म 'महाभारत' व्यतिरिक्त आमिर 'मोगुल' मधेही काम कारणार आहे. ही गुलशन कुमारची बायोपिक आहे. फिल्म खूप दिवसांपासून चर्चेत आहे आणि आमिर याला प्रोड्यूस करणार होता. मात्र चित्रपटाचे डायरेक्टर सुभाष कपूरचे सेक्सुअल हैरेसमेंटचे जुने प्रकरण पुन्हा सुरु झालायनंतर आमिरने फिल्म सोडली. आता असे सांगितले जाते की भूषण कुमार आमिरला या चित्रपटात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, आमिरने  या चित्रपट लीड रोल करण्यासाठी इंटरेस्टही दाखवला होता. चित्रपट पुढच्या महिन्यात फ्लोरवर जाऊ शकते पण त्याच्यासाठी कुठलीही ऑफिशियल अनाउंसमेंट अद्याप झालेली नाही. 

 

2 -याव्यतिरिक्त आमिर ओशोच्या बायोपिकचाही भाग होता. याला करन जौहरच्या डायरेक्शनमध्ये शकुन बत्रा डायरेक्ट करणार होता. चर्चा हीसुद्धा झाली की आलिया भट्‌ट फिल्ममध्ये मां आनंद शीलाची भूमिका करणार होती. सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार या प्रोजेक्टलाही सध्या आमिरने होल्डवर ठेवले आहे. आता आमिर आणि शकुन दोघेही या चित्रपटाचा भाग नाहीत. 

 

3 - आमिर हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' चा हिंदी रीमेकसुद्धा करणार होता. त्याला चित्रपटाचे राइट्सही मिळाले आहेत. अद्वैत चंदन, ज्याने 'सीक्रेट सुपरस्टार' ला डायरेक्ट केले होते, तो हा चित्रपट डायरेक्ट करू शकतो. आमिरची तुलना नेहमीच हॉलीवूडचा अभिनेता टॉम हैंक्स याच्यासोबत केली जाते, जो या चित्रपटात स्टार होता. मात्र या प्रोजेक्टचेही अद्याप ऑफिशियल अनाउंसमेंट झालेली नाही. 

 

4 - चर्चा होती की आमिर फातिमा सना शेखसोबत रोमांटिक फिल्म बनवनार आहे. तो यात एक स्टार असेल आणि अमिताभ बच्चनही या चित्रपट काम करणार होते. प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही आणि हा प्रोजेक्ट कधी सुरु होवू शकतो याबद्दलही काही माहिती कळलेली नाही. याव्यतिरिक्त अमीन हाजी, ज्याने आमिरसोबत 'लगान' मध्ये काम केले होते. तो त्याच अखूप जवळच मित्र झाला होता. त्याने आमिरला एक लीड रोल करण्यासाठी अप्रोच केले होते आणि आमिरनेही त्यासाठी हो म्हणले होते. आता हा प्रोजेक्ट कधी सुरु होईल हे माहित नाही. 

 

आमिर घेऊ शकतो सहा महिन्यांचा ब्रेक.. 
'ठग्स ऑफ हिंदोस्तां' च्या अपयशानंतर आमिर खानच्या स्टारडम वरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे सध्या हि चर्चा जास्त वाढली आहे की आमिर खान कामापासून सहा महिन्यांचा ब्रेक घेऊ शकतो. त्या ब्रेकसाठी त्याने कितीतरी कामे हातात घेतली नाहीत. आमिरने हेही ठरवले आहे की सध्या माइंडलेस मसाला चित्रपटांना हात लावायचा नाही. तो पूर्णपणे कंटेंट बेस्ड चित्रपटाचं करणार आहे. 

 

जेव्हा आमिरला मागावी लागली माफी.. 
आमिर खानने पहिल्यांदा मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत मोठ्या पडद्यावर काम केले पण कथेमध्ये नवेपण नसल्यामुळे प्रेक्षकांनी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' पूर्णपणे नापसंती दर्शविली. फिल्म फ्लॉप होण्याची पूर्ण जबाबदारी घेत आमिर खानने प्रेक्षकांची माफीही मागितली होती. आमिर म्हणाला होता, 'फिल्म अयशस्वी होण्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. आम्ही खूप मेहनत केली पण आमच्याकडून कुठेतरी काही चूक निश्चितच झाली आहे. मात्र काही लोक आहेत ज्यांना चित्रपट आवडला आहे. त्यासाठी मी त्य्नाचे आभार मानतो. पण अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे. जास्त लोकांनां आमचा चित्रपट आवडला नाही आणि या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. मी त्या सर्वांची माफी मागतो. जे खूप आशेने माझा चित्रपट पाहायला आले पण यावेळी मी त्यांचे मनोरंजन करू शकलो नाही. वास्तविक मी माझ्या चित्रपटांच्या खूप जवळ आहे, माझे चित्रपट माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे आहेत."

 

इंडिया नाही, आता चायनीज मार्केटकडून आहे आमिरला अपेक्षा...
'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' इंडियन मार्केटमध्ये चांगले परफॉर्म करू शकली नाही. अशात आता आमिरला चायनीज मार्केटकडून अपेक्षा आहेत. चित्रपट 28 डिसेंबरला चीनमध्ये रिलीज होत आहे. आमिर खानचे चीनमध्ये चांगले फैन फॉलोइंग आहे आणि तिथे त्याच्या इतर चित्रपटना खूप प्रतिसाद मिळाला आहे. आमिरच्या 'सीक्रेट सुपरस्टार' (जवळपास 750 कोटी) आणि 'दंगल' (1200 कोटी) या चित्रपटांनी अशी दांडगी कमाई केली होती. मात्र इंडियामध्ये 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' अपयशी झाल्यानंतर हा मोठा प्रश्न आहे की चीनमध्ये या चित्रपटाला यश मिळेल का ?

 

बातम्या आणखी आहेत...