आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक: 18 वर्षांपूर्वीच्या या सुपरहिट फिल्ममध्ये शाहरुखच्या भूमिकेसाठी हा अॅक्टर लागला होता मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 2000 मध्ये आलेला 'जोश' हा पहिला असा चित्रपट होता, ज्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघे बहीणभावाच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाशी निगडीत एक रंजक किस्सा अलीकडेच समोर आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मन्सूर खान यांनी एका मुलाखतीत सांगितले, 'जोश चित्रपटातील चंद्रचूड सिंहने साकारलेली भूमिका सुरुवातीला आमिर खानला ऑफर झाली होती. पण त्यावेळी तो लव्हर बॉयची भूमिका साकारण्यास तयार नव्हता, म्हणून त्याने ही भूमिका नाकारली होती. आमिरला शाहरुखने साकारलेली मॅक्सची भूमिका वठवायची होती.' बातम्यांनुसार, आमिर मॅक्सच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाच्या मागे लागला होता, पण दिग्दर्शक यासाठी तयार झाले नव्हते.

 

मन्सूर खान यांनी सांगितले की, शाहरुखच्या बहिणीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला काजोलला अप्रोच करण्यात आले होते. पण तिलाही मॅक्सची भूमिका साकारायची होती. नंतर ऐश्वर्याची निवड या भूमिकेसाठी झाली. मन्सूर खान यांनी सांगितले की. 'जोश चित्रपटातील शाहरुखची मॅक्सची भूमिका अनेकांना पसंत पडली होती, अनेक स्टार ही भूमिका साकारण्यास इच्छूक होते.' 'जोश'मध्ये शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चनसह चंद्रचूड सिंह मुख्य भूमिकेत होता. 

 

...तर ऐश्वर्याचा भाऊ बनला असता सलमान खान 

अलीकडेच ऐश्वर्याने खुलासा केला, ''शाहरुखपूर्वी ही भूमिका सलमान खानला ऑफर झाली होती. तर चंद्रचूड सिंहच्या भूमिकेसाठी आमिर खानला अप्रोच करण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सतत बदल होत आले आणि जेव्हा चित्रपटाची संपूर्ण टीम बदलली गेली, तेव्हा मी या चित्रपटाला होकार दिला होता.' रिपोर्ट्सनुसार, जर सलमानने हा चित्रपट साइन केला असता तर त्याला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका यात साकारावी लागली असती. त्याकाळात ऐश्वर्या आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे सलमानने ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...