स्टार किड : पिता आमिरच्या मापदंडांमध्ये खरा नाही उतरला जुनैद, त्यामुळे नाही मिळाला ‘लाल सिंह चड्ढा’ चा रोल

लाल सिंहच्या भूमिकेत दिसणार आमिर... 

दिव्य मराठी

Apr 24,2019 11:42:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडमध्ये लॉन्च होणाऱ्या स्टारकिड्सच्या लिस्टमध्ये यावर्षी आमिर खानचा मुलगा जुनैदचे नावदेखील सामील होते, पण त्याचे वडील मि. परफेक्शनिस्टच्या आव्हानांमध्ये तो पस झाला आंही मुणून त्याच्या हातून ही संधी गेली. आमिरच्या जवळच्यांनी ही माहिती दिली की, ‘फॉरेस्ट गम्प’ चा अधिकृत रीमेक ‘लाल सिंह चड्ढा’ ने जुनैदची ग्रँड लॉन्चिंग ठरलेली होती. त्यासाठी जुनैदचे काही महिने ट्रेनिंगसुद्धा झाले. त्याच्यावर फिल्मधी काही सीन चित्रितही केले गेले पण त्याचे वडिल त्याच्या परफॉर्मन्सने पूर्णपणे संतुष्ट नव्हते. जुनैदने त्याच्या पद्धतीने खूप प्रयत्न केले पण आमिरच्या अपेक्षांची लेव्हल तो पार करू शकला नाही.

आमिरला वाटले की, जुनैद मूळ फिल्मच्या टॉम हैंक्सच्या भूमिकेला ‘लाल सिंह चड्ढा’ च्या अभिनेत्याच्या नात्याने त्याच मॅच्युरिटीने प्ले नाही करू शकणार. म्हणून मग त्याने सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. ठरवले की, हा रोल तो स्वतः प्ले करेल. आमिर फिल्मच्या प्री प्रोडक्शन वर्कमध्ये खूप जास्त वेळ घेत आहे.

जुनैदच्या क्रिएटिव साइडवर एक नजर...
- अमेरिकन अकेडमी ऑफ ड्रामा आर्टमधून थिएटर एक्टिंगचा अभ्यास केला आहे.
- ‘पीके’ मध्ये डायरेक्टरला असिस्ट केले.
- एक वर्षांपासून सतत थिएटरमध्ये सहभागी होत आहे.
- 'रूबरू रोशनी’ च्या प्रमोशनसोबत जोडलेला होता.

इतरही कलाकार केले आहेत लॉन्च...
आमिर खानने इतरही काही कलाकार आपल्या फिल्ममधून लॉन्च केले आहेत. ‘तारे जमीं पर’ च्या माध्यमातून दर्शील सफारी याला तर ‘दंगल’ ने जायरा वसीम, अपारशक्ति खुराना, सान्या मल्होत्रा यांना संधी दिली.

आपल्या मुलांच्या बोलीववूडमध्ये एंट्रीबद्दल काय आहेत आमिर खानचे विचार...
एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, 'माझ्या मुलांना फिल्ममध्ये काम करण्यापूर्वी पूर्ण प्रोसेज फॉलो करावे लागेल. त्यांना ऑडिशन द्यावे लागेल आणि स्क्रीन टेस्ट पास करावे लागेल. विना ऑडिशन तर ते माझ्या होम प्रोडक्शनमध्येही काम करू शकत नाहीत.' त्यानंतर करण जोहरच्या चॅट शोमध्ये आमिर म्हणाला होता, माझी मुले जुनैद आणि ईरा बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी इच्छुक आहेत पण जर ते हे डिजर्व करत नसतील तर मी त्यांना एक्टिवली सपोर्ट करू शकणार नाही.

‘लाल सिंह चड्ढा' मध्ये कॅमियो करणार आहे जायरा वसीम...
दुसरीकडे बातमी आहे की, आमिरची फेव्हरेट जायरा वसीम ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमियो करू शकते. सूत्रांनुसार, ‘टीमला फीमेल लीडची युवा भूमिका साकारण्यासाठी एका युवा चेहऱ्याची गरज आहे. यासाठी जायराचा विचार केला जात आहे. आमिरचे म्हणणे आहे की, तिचा लुक भूमिकेला हवा तसाच आहे आणि तिच्याकडे रोल निभावण्याची स्किल्सदेखील आहेत. हा एक मोठा कॅमियो असेल, ज्यामध्ये जायराचा जास्त वेळ लागणार नाही. तिने लुक टेस्ट दिले आहे आणि ती लवकरच बोर्डवर येऊ शकते.’

X