आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी पैसे लागताहेत - अमित देशमुख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - आपली प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी लातूरकर क्रीडा संकुल मैदानावर जातात. मात्र सध्या या ठिकाणी जाऊन मोकळा श्वास घेणाऱ्यांनाही पैसे मोजावे लागत आहेत हे अजब आहे, असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. सोमवारी रात्री एका खासगी फिटनेस क्लबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  देशमुख पुढे म्हणाले की प्रत्येकजण आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील आहे. लातूरमध्ये क्रीडा संकुलावर दररोज १० हजाराहून अधिक लोक येतात. त्यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध आणि महिलांचा समावेश आहे.  आम्ही सत्तेवर असताना लातूरकरांसाठी मध्यवर्ती ठिकाणी या सगळ्या सोयी केल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून येथे पैसे मोजावे लागत आहेत. म्हणजे लातूरमध्ये आता मोकळा श्वास घेण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहेत हे अजबच आहे, असे ते म्हणाले. याच क्रीडा संकुलात काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या पार्कचे नूतनीकरण झाले. त्यासाठी खासगी व्यक्तीला सामावून घेण्यात आले. पूर्वी तेथे मुले मोफत खेळायची. मात्र आता त्या ठिकाणी प्रवेश करायलाही पैसे लागतात. हे चांगले नाही, असे मत आमदार देशमुख यांनी नोंदवले.

बातम्या आणखी आहेत...