बाॅक्सिंग / अमितचा पराभव; राैप्य विजेता पहिला भारतीय बाॅक्सर

जागतिक बाॅक्सिंग स्पर्धा :  जाेइराेवची अमितवर 5-0 ने मात

वृत्तसंस्था

Sep 22,2019 10:47:00 AM IST

एकतेरिनबर्ग - भारताच्या सुपर स्टार बाॅक्सर अमित पंघालचा जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत गाेल्डन पंच मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याला रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ताे स्पर्धेत राैप्यपदकाचा मानकरी ठरला. यासह त्याने विक्रमी पदकाची कमाई केली.

जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत राैप्यपदक जिंकणारा अमित हा भारताचा पहिला बाॅक्सर ठरला. आॅलिम्पिक चॅम्पियन जाेइराेवने ५२ किलाे वजन गटाच्या फायनलमध्ये भारताच्या अमितचा पराभव केला. त्याने ५-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

X
COMMENT