आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या को-स्टारला मिळाली नवी गर्लफ्रेंड, वयाने आहे 10 वर्षांनी लहान, स्वतः अभिनेत्याने सांगितले का सोडून गेली होती पहिली गर्लफ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  'सुल्तान' या चित्रपटात सलमान खानसोबत आणि 'गोल्ड' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणारा अभिनेता अमित साधविषयी एक वृत्त समोर आले आहे. बातम्यांनुसार, अमितच्या आयुष्यात त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आहे. अमितच्या या नव्या गर्लफ्रेंडचे नाव अन्नाबेल डासिल्वा असे आहे. अन्नाबेल ही एक फिटनेस मॉडेल असून मुळची यूएसची आहे.  अमितने नवीन गर्लफ्रेंडची ओळख करुन देताना तिच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेत. फोटो पोस्ट करुन अमितने त्याला कॅप्शन दिले,  'My guest on set!My significant other @annabel.fit Very happy you are here my love ...I just hope I don't give too many retakes 😋'.


अमितपेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे अन्नाबेल...
- अन्नाबेलपूर्वी अमित इंग्लंडमध्ये राहणा-या एका तरुणीला डेट करत होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. अमितने वर्षभरापूर्वी एका मुलाखतीत ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. 
- मुलाखतीत अमितने सांगितले होते, काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये माझी एक गर्लफ्रेंड बनली होती. ती जसे म्हणायची तसेच मी वागायचो. त्याच काळआत तिग्मांशू धुलियांचा एक चित्रपट आला, त्यात मी गँगस्टरची भूमिका साकारली होती. त्यासाठी मी काही किलो वजन वाढवले होते. बोलण्याची पद्धतही गँगस्टरसारखी झाली होती. याकाळात जेव्हाही इंग्लंडहून माझ्या गर्लफ्रेंडचा फोन यायचा, तेव्हा ती माझ्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायची. 
- मी माझे पात्र जगत होतो. पण ती हे कधी समजूच शकली नाही. याच कारणामुळे आमचे ब्रेकअप झाले, असे अमितने सांगितले होते. या ब्रेकअपनंतर मी पुन्हा नवीन नात्यात अडकू इच्छित नव्हतो, असेही अमित म्हणाला होता.


आयुष्यात करावा लागला बराच संघर्ष... 
अमितचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले आहे. त्याची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती, की उदरनिर्वाहासाठी त्याला लोकांच्या घरी भांडी घासण्याचे काम करावे लागले होते. एका मुलाखतीत अमितने स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले होते. बालपणी ड्रग्स आणि दारुचे व्यसन जडल्याचेही त्याने सांगितले होते. अमितला 2013 मध्ये आलेल्या काय पो छे या चित्रपटातून यश मिळाले.


अभिनयासाठी सोडले होते 12 वी शिक्षण...
अमित साधने सांगितले, 'काई पो छे' या चित्रपटानंतर माझ्या हातात एकही काम नव्ह.े मी दोन वर्षे बेरोजगार होतो. त्याकाळात अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला होता. माझ्याजवळ भाड्याचे पैसे देण्यासाठीही एक रुपयादेखील नव्हता.'
- अमितने सांगितले, 'काम मिळत नसल्याने माझ्यावर झालेले कर्ज कसे फेडणार याची चिंता मला लागली होती. त्याकाळात बरंच कर्ज माझ्यावर झालं होतं. ' 
- अमित पुढे म्हणाला, आयुष्यात मला बराच संघर्ष करावा लागला आहे. सात वर्षे एक चित्रपट मिळवण्यासाठी मी चपला झिजवल्या आहेत.

 

एका गोष्टीची वाटते कायम भीती...
अमित सांगतो, पुर्वीसारखी परिस्थिती माझ्यावर ओढवू नये, याची सतत आजही मला भीती वाटते. माझे बालपण हलाखीत गेले. बालपणीच मला दारु आणि ड्रग्सचे व्यजन जडले होते. पण आज मी त्या वस्तूंना स्पर्शही करत नाही. आयुष्य ट्रॅकवर आणण्यासाठी मला अभिनयाची मोठी मदत झाली. अपयश आणि आयुष्यातील वाईट काळातून अभिनयाने मला बाहेर काढले आणि मी आज या स्थानी आहे.'


अमितपूर्वी एका बॉडी बिल्डरला डेट करत होती अन्नाबेल...
25 वर्षीय अन्नाबेलचा जन्म यूएसमध्ये झाला. ती एक फिटनेस मॉडेल आहे. अमितला डेट करण्यापूर्वी ती युग वर्मा नावाच्या एका बॉडी बिल्डरला डेट करत होती. अन्नाबेलने हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण सोडले आणि मॉडेलिंग क्षेत्रात आली. तिने 2017 मध्ये गायक अंकित तिवारीच्या 'तेरे जाने से' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...