आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amit Shah, Assaduddin Owaisi Spar Over NIA Amendment Bill Discussions In Lok Sabha

लोकसभेत शहा-ओवैसींमध्ये शाब्दिक वाद; शहांनी एमआयएम नेत्यांना बोट दाखवण्यावरून उडाला गदारोळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सोमवारी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था कायद्यात बदलाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. या दरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी भाजपचे गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात चांगलीच जुंपली. लोकसभेत भाजप खासदार बोलत असताना ओवैसींनी मध्ये बोलण्यावरून शहांनी त्यांच्याकडे बोट दाखवून शांत राहण्याचे आवाहन केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.


नेमके काय घडले....
लोकसभेत एनआयए संशोधन विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावर बागपत येथून भाजपचे खासदार आणि माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आपले मत मांडत होते. हैदराबादेतील एका राजकीय नेत्याकडून तेथील पोलिस आयुक्तावर तपास बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता असे आरोप सत्यपाल सिंह यांनी केले. त्यावेळी आपण मुंबईत पोलिस आयुक्त असल्याने आपल्याला या घटनेची माहिती होती. संबंधित पोलिस आयुक्ताने तपास फिरवला नाही तर त्यांची बदली केली जाईल असेही कथितरित्या त्या नेत्याने धमकावले होते. यावर वेळीच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला. त्यावेळी नेमके काय घडले याचे संपूर्ण दस्ताऐवज आणि रेकॉर्ड सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत मांडावेत असे ओवैसी म्हणाले.


विरोधकांनी ऐकून घेण्याची सवय लावावी -अमित शहा
ओवैसींच्या आक्षेपावर गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपल्या जागेवर उभे ठाकले. तसेच त्यांनी ओवैसींकडे बोट दाखवून विरोधकांनी ऐकून घेण्याची सवय लावावी असे म्हटले. विरोधक जेव्हा सभागृहात बोलतात तेव्हा सत्ताधारी मध्येच काहीही बोलत नाहीत. त्यामुळे, विरोधकांनी सुद्धा असेच करावे. त्यावरच ओवैसी आणखी भडकले. मला बोट दाखवू नये मी घाबरणार नाही असे ओवैसींनी ठणकावले. त्यास उत्तर देताना भीती आपल्या डोक्यात आहे त्याला मी तरी काय करणार! असा टोला शहांनी लगावला.