आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे मोदी सरकार आहे, पाकमधून गोळी आली तर भारतातून गोळा टाकणार -नागपुरात अमित शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचार सभेला संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचे कौतुक केले. 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक आणि नुकताच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करून साऱ्या जगाला मोदी सरकारने दहशतवादविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. पाकमधून गोळी चालत असेल तर मोदी सरकारमध्ये भारतातून गोळा टाकला जाईल असे अमित शहा यांनी सांगितले आहे.


हवाई हल्ल्यानंतर देशात जल्लोष अन् राहुल गांधींच्या गोटात शोक -अमित शहा
नागपुरातील सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला होता. लोक सर्जिकल स्ट्राइकचे अंदाज लावत होते. पाकिस्तानने तर सीमांवर सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने सीमेवर रणगाडे तैनात केले होते. अशात मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने वेगळ्या पद्धतीने बदला घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी अतिशय नियोजित पद्धतीने एअर स्ट्राइक करण्यात आले. या हवाई हल्ल्यानंतर समस्त देशात नागरिकांनी जल्लोष साजरा केला. परंतु, दोन ठिकाणी शोक व्यक्त करण्यात आला. त्यापैकी एक म्हणजे, पाकिस्तान आणि दुसरे राहुल गांधी आणि मंडळी... मोदी सरकार सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या देशांसोबत शांतता चर्चा करणार नाही असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.