आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Challenges Rahul Gandhi To Show One Clause Against Indian Minorities In CAA At Shimla BJP Rally

अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावणार अशी एक तरतूद दाखवाच; गृहमंत्र्यांचे राहुल गांधींना आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभर आंदोलने सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात अशी एक तरतूद दाखवावी ज्यामध्ये मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावले जाईल. हिमाचल प्रदेशात भाजप सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका सभेला संबोधित करताना शहा बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाय कुणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही. बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याक बंधूंना भारताचे नागरिकत्व देणे हा या कायद्याचा हेतू आहे. परंतु, काँग्रेस आणि कंपनीकडून अल्पसंख्याक समुदायामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत असा आरोप गृहमंत्र्यांनी यावेळी बोलताना केला.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार -शहा

केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिमाचलमध्ये भाजप सरकारच्या कौतुकांचे पाढे वाचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे गुणगाण गायले. केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपल्या देशातील जवानांचे शिरच्छेद व्हायचे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख शहांनी मौन मोहन सिंग असा केला. त्या सरकारमध्ये पाकिस्तानविरुद्ध काहीच करण्यात आले नाही. त्या उलट भाजपची सत्ता आली आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी बसले. याच नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून धडा शिकवला असे शहा म्हणाले. यासोबतच, राम मंदिराचा मुद्दा देखील त्यांनी यावेळी काढला. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. त्यावर बोलताना, अयोध्येत भव्य गगनचुंबी राम मंदिर उभारले जाईल असे अमित शहांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...