आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड शोनंतर अमित शाह यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; अटलजी-आडवाणीजी जेथून लढले तेथे उमेदवारी मिळणे भाग्याचे - शाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अहमदाबाद/गांधीनगर(गुजरात)- पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह आज गांधीनगर सीटसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी 4 किलोमीटरचा रोड शो केला. या रोड शोत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलचे प्रमुख प्रकाश सिंग बादल आणि लोजपा नेते रामविलास पासवानसोबतच अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमालात गांधीनगरचे विद्यमान खासदार लालकृष्ण आडवाणी हे आले नाहीत. भाषण करतेवेळी अमित भाह म्हणाले-ज्या मतदार संघातून अटलजी-आडवाणीजी खासदार बनले, तिथून उमेदवारी मिळण माझ्यासाठी भाग्याचे आहे.


'आयुष्यातून भाजप काढले तर काहीच उरणार नाही'
शाह म्हणाले- ''मी निवडणूकीच्या कार्यातही सहभागी होतो, छोट्याशा कार्यकर्त्यापासून ते जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाचा अध्यक्षापर्यंतचा माझा प्रवास आहे. माझ्या आयुष्यातून भाजपला काढले तर काहीच राहणार नाही. पक्षामुळेच मी देशाला सगळ देउ शकलो आहे. गांधीनगरमधून आडवाणीजी सोबतच अनेक नेते खासदार राहिले आहेत. शिवाय मी येथून 5 वेळा आमदार राहिलो आहे.''

 

"ही निवडणूक एकाच मुद्यावर होत आहे, तो म्हणजे देशाचे नेतृत्व कोण करणार. कानाकोपऱ्यातून एकच आवाज येतो, तो म्हणजे मोदी-मोदी. विरोधकांना या गोष्टिचे आश्चर्य आहे की, असा व्यक्ती ज्याचा राजकारणाशी काहिही संबंध नव्हतो तो गुजरातचा मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान झाला. आज मोठा प्रश्न आहे की, देशाला सुरक्षित कोण करत आहे. फक्त मोदी आणि भाजपच देशाला सुरक्षित ठेवू शकतात. मोदीजी पंतप्रधान बनणार आहेत, माझी गुजरातच्या जनतेला विनंती आहे की, येथील 26 सीट भाजपच्या पारड्यात टाका."


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले- "भाजप आणि आमच्यामध्ये काही मतभेद होते परंतु आम्ही एकत्र येऊन ते दूर केले आहेत. मी येथे अमित भाईचे समर्थन करण्यासाठी आलो आहे. भाजप आणि आमचे विचार एकसारखेच आहेत. विकासाचे विचार घेऊनच आम्ही पुढे निघालो आहोत. माझ्या वडिलांनी मला प्रत्येक काम मनापासून करण्याची शिकवण दिली आहे. आमच्या पक्षांमध्ये मतभेद होऊ शकतात परंतु आम्ही मनाने आम्ही वेगवेगळे नाहीत. आम्ही कधीची कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही आणि कधीही असे करणार नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. श्वास थांबला तर कसे जगणार." 

 

राजनाथ सिंह म्हणाले, "विरोधक म्हणतात चौकीदार चोर आहे, पण मी म्हणतो की, चौकीदार चोर नसून प्यूर आहे आणि ते पुन्हा पंतप्रधान बनणार हे श्योर आहे."

नितीन गडकरी म्हणाले-'' जे काम 50 वर्षात नाही झाले, ते मोदींनी 5 वर्षात केले. त्यामुळे मोदी पुन्हा निवडूण येणार आहेत.''