आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाहीये. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. पण, त्यांनाही सत्ता स्थापन करता न आल्याने अखेर राज्यपालांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री माध्यमांसमोर आले. एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली.
यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे 105 आमदारांचे संख्याबळ आहे, त्यावरुन आम्ही सत्ता स्थापन करू शकणार नव्हतो. म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. विरोधक राष्ट्रपती राजवटीवर राजकारण करत आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला. तसेच, कमी वेळ मिळाल्याची तक्रार करणाऱ्यांसाठी आला 6 महिन्यांचा वेळ मिळाला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांवर लगावला. शिवसेनेबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की, त्यांनी मान्य न होणाऱ्या अटी आमच्यसमोर ठेवल्या होत्या.
"राज्यापालांनी संविधानाचं कुठेही उल्लंघन केलं नाही. सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी असमर्थतता दर्शवली होती. म्हणूनच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राज्यपालांनी 18 दिवस सत्तास्थापनेसाठी दिले होते. मात्र कोणताही पक्ष किंवा कोणतीही आघाडी-युती सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागली", असे अमित शाह म्हणाले.
शिवसेनेवर टीका करताना शहा म्हणालेकी, "बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली ते सांगणे मला योग्य वाटत नाही. माझ्या पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला नेमकं काय वचन दिलं होतं ते सांगणं टाळलं. आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली," असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.