आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah Hate Speech In Muzaffarnagar News In Marathi

मुजफ्फरनगर चिथावणीखोर भाषण: अमित शहा यांना निवडणूक आयोगाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये दंगलग्रस्त भागात बदला घेण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे जाटांना आवाहन करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे सहकारी अमित शहा अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अमित शहा भाजपच्या उत्तर प्रदेश प्रचार समितीचे प्रमुख आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुजफ्फरनगर भागात उसळलेल्या दंगलीचा बदला घ्यायचा असेल तर भाजपला मतदान करा, असे आवाहन अमित शहा यांनी जाट समाजाच्या लोकांना केले होते. त्यानंतर कॉंग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक राजकीय पक्षांनी त्यावर आक्षेप नोंदविला होता.
दरम्यान, भाजपचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांची खांडोळी करण्याची भाषा करणाऱ्या इमरान मसुद यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली. मात्र अमित शहा यांच्यावर कारवाई करण्यात एवढा विलंब का लावण्यात आला, असा सवाल ट्विटरवर विचारला आहे.
अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडिओ बघितल्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.