आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीनंतर नायडू रालोआत परत येतील : अमित शहा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी आंध्र प्रदेशात निवडणुकीचा बिगुल फुंकला. शहा यांनी मॅसनिक टेंपल ग्राउंडमध्ये झालेल्या परिषदेत सांगितले की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. २००४ पर्यंत अटलजी यांचे सरकार होते तेव्हा ते त्यांच्यासोबत होते. २००४ मध्ये काँग्रेसचे सरकार आले तेव्हा ते त्यांच्यासोबत गेले. ते आता ज्यांनी आंध्र प्रदेशचा अपमान केला अशा काँग्रेसचे पुन्हा समर्थन करत आहेत. 


शहा म्हणाले, २०१९ मध्ये रालोआ सरकार सत्तेत येईल तेव्हा ते पुन्हा परत रालोआमध्ये परतण्याचा प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे. रालोआ सरकारने आंध्र प्रदेशच्या विकासासाठी जे केले ते काँग्रेसने ५५ वर्षांच्या कार्यकाळापेक्षा १० पट जास्त आहे. मी चंद्राबाबू यांना केवळ एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्या रालोआने आंध्र प्रदेशच्या विकासासाठी ५,५६,००० कोटी रुपये दिले त्यांची साथ नायडूंनी का सोडली? 


चंद्राबाबू सरकारविरोधात निवडणूक अायाेगाकडे तक्रार 
नवी दिल्ली | अांध्र प्रदेशातील मतदार यादीत चंद्राबाबू नायडू सरकारने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून फेरबद्दल केला, असा अाराेप करत वायएसअार काँग्रेस पार्टीने निवडणूक अायाेगाकडे तक्रार दाखल केली. वायएसअार काँग्रेसचे अध्यक्ष जगन माेहन रेड्डी यांनी मुख्य निवडणूक अायुक्त सुनील अराेडा यांची भेट घेतली. राज्य सरकार सरकारी यंत्रणेचा दुरुपयाेग करून मतदार यादीत फेरबद्दल करत अाहे. विराेधी पक्षाविराेधात पोलिसांचा वापर करत अाहे. राज्य सरकार अनेक बेकायदेशीर पावले उचलत असून निवडणूक अायाेगाने हस्तक्षेप करावा. यासंदर्भात त्यांनी अायुक्त अराेडा यांना एक निवेदनही दिलेे. 
 

बातम्या आणखी आहेत...