Home | National | Other State | Amit Shah Kolkata roadshow violence; Shah says 3 attacks on me in Kolkata, already have information about stone pelting

अमित शाह म्हणाले- कोलकातामध्ये माझ्यावर 3 हल्ले झाले, सीआरपीएफचे जवान नसते तर बचावलो नसतो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 12:50 PM IST

ममता म्हणाल्या- शाह देव आहे का, की त्यांच्याविरूद्ध प्रदर्शन करता येणार नाही

 • Amit Shah Kolkata roadshow violence; Shah says 3 attacks on me in Kolkata, already have information about stone pelting

  कोलकाता(पश्चिम बंगाल)- भाजप अध्यक्ष अमित शाहने कोलकातामध्ये रोड शोदरम्यान भडकलेल्या हिंसेवरून तृणमूल काँग्रेसवर निशाना साधला आहे. ते म्हणाले की, "आम्ही शांतीने रोड शो काढला होता, पण या दरम्यान तीन हल्ले झाले. आमच्याकडे माहिती मिळाली होती की, यूनिव्हर्सिटीमधून काही लोक येऊन दगडफेक करणार आहेत. जर सीआरपीएफचे जवान नसते तर आम्ही वाचलो नसतो. मी दीदीला अपील करतो की, काही लपवायचे नसेल तर, एखाद्या निष्पक्ष एजंसीकडून तपास केला जावा." तर दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, अमित शाह देव आहेत का, त्यांच्याविरूद्ध प्रदर्शन काढता येत नाही का...?


  मंगळवारी रात्री शाह यांच्या रोड शोदरम्यान जोरदार गोंधळ झाला. अमित शाह त्या गाडीवर उभे होते, त्या गाडीवर लाठ्या फेकण्यात आल्या. रोड शोवर काही लोकांनी दगड फेकले आणि जाळपोळदेखील केली. पोलिसांना गोधंळ नियंत्रणात आणण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला. या सर्व गोंधळानंतर रोड शो संपवावा लागला.


  यूनिव्हर्सिटीच्या आतमधून दगडफेक झाली
  शाह यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, "या निवडणुकीत बंगालशिवाय इतरत्र कुठेही हिंसा झाली नाहीये. भाजप संपूर्ण देशात निवडणूक लढवत आहेत, पण तुम्ही(मामता बॅनर्जी) फक्त बंगालच्या 42 सीट्ससाठी निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या कोणत्याच राज्यात हिंसा झाली नाहीये, फक्त बंगालमध्येच झाली. काल या सर्व गोंधळानंतर पोलिस विभाग आणि निवडणूक आयोगाने काहीच प्रतिक्रीया दिली नाही. पंतप्रधान, माझे आणि भाजपच्या इतर नेत्यांची पोस्टर फाडली गेली. दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. यूनिव्हर्सिटीच्या आतून दगडफेक करण्यात आली."


  तृणमूल कार्यकर्त्यांनी विद्यासागर यांची मूर्ती तोडली- शाह
  शाह म्हणाले की, "यूनिव्हर्सिटीच्या आत जाऊन ईश्वरचंद विद्यासागर यांची मुर्ती कोमी तोडली. आतून तर तृणमूलचे कार्यकर्ते दगडफेक करत होते. ते यूनिव्हर्सिटीमधून लाठ्या घेऊन बाहेर येत होते. भाजपचे सगळे कार्यकर्ते तर बाहेर पोलिसांसोबत होते. टीएमसी कार्यकर्त्यांनी व्होटबँकसाठी विद्यासागर यांची मुर्ती तोडली. मला वाटते की, आता ममता सरकारचे उलटे पाडे सुरू झाले आहेत. माझ्यावर बंगालमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मी तुम्हाला(ममता बॅनर्जी) घाबरत नाही."


  ममता यांनी भाजपवरच मुर्ती तोडण्याचा आरोप लावला
  ममता म्हणाल्या, "ते (भाजपा) असंस्कारी आहे, यामुळेच त्यांनी विद्यासागर यांची मुर्ती तोडली. ते सगळे बाहेरून आलेले आहेत, शाह यांना कलकत्ता विश्वविद्यालयबद्दल माहिती आहे का? कोण कोणत्या महान हस्त्यांनी येथे शिक्षण घेतले आहे ते त्यांना माहित आहे का? अशा प्रकारचे हल्ले करून त्यांना लाज वाटत नाही का."


  निवडणूक आयोगाला भेटणार तृणमूलचे नेते
  ममता बॅनर्जी हेदेखील म्हणाल्या की, कोलकातामध्ये शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. भाजप येथे खूप पैसे खर्च करत आहेत. निवडणूक आयोग त्यांच्याविरूद्ध काहीच कारवाई का करत नाहीये? यानंतर हिंसेबद्दल बोलण्यासाठी निवडणूक आयोगाला तृणमूलचे एक मंडळ जाणार आहे


  भाजपची निवडणूक आयोगाला अपील- ममतांना प्राचारापासून रोखा
  भाजपने निवडणूक आयोगाला अपील केली आहे की, ममता यांना प्रचार करण्यापासून रोखले जावे. भाजपचा आरोप आहे की, राज्यात सविंधानाच्या विरूद्ध कृत्य केले जात आहे. शाह यांच्या रोड शोमध्ये भडकलेल्या हिसांचारानंतर मंगळवारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांच्या अध्यक्षेतेखाली भाजपचे प्रतिनिधिमंडळाने निवडणूक आयोगाकडे गेले. भाजपने आयोगाकडे बंगालच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, म्हणजेच तिथे निष्पक्ष निवडणूका होतील.


 • Amit Shah Kolkata roadshow violence; Shah says 3 attacks on me in Kolkata, already have information about stone pelting
 • Amit Shah Kolkata roadshow violence; Shah says 3 attacks on me in Kolkata, already have information about stone pelting
 • Amit Shah Kolkata roadshow violence; Shah says 3 attacks on me in Kolkata, already have information about stone pelting

Trending