आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींच्या सर्वच कॅबिनेट समित्यांवर अमित शहा; राजनाथसिंहांची सहा समित्यांवर वर्णी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळाचा प्रारंभ करताना ८ कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून यात गृहमंत्री अमित शहा यांची सर्वच समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या या विविध समित्या सर्व मंत्रालयांचे महत्त्वाचे निर्णय घेतात. शहा यांची सर्वच समित्यांवरील नियुक्ती मोदी सरकारमधील त्यांचे महत्त्वाचे स्थान दर्शवत असल्याचे मानले जात आहे.


गुरुवारी सरकारने या समित्यांमधील सर्व सदस्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार शहा सर्वच समित्यांमध्ये असतील, तर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना प्रारंभी दोन समित्यांमध्येच स्थान देण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांना आखणी चार समित्यांमध्ये स्थान देण्यात आले. त्यामुळे तेही संरक्षण, आर्थिक,  राजकीय निर्णयासंबंधी समितीसह महत्त्वाच्या सहा समित्यांवर असतील. मोदी यांनी स्वत:कडे गृह तसेच संसदीय कामकाज या दोन समित्या घेतलेल्या नाहीत. या दोन्ही समित्यांचे अध्यक्षपद त्यामुळे अमित शहा यांच्याकडे असेल. यातील एका समितीमध्ये भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सात समित्यांत असतील.


गृहमंत्री सर्वच समित्यांमध्ये ...
जाणकारांनुसार गृहमंत्री हे महत्त्वाचे पद असल्याने संबंधित मंत्र्यास सर्व समित्यांमध्ये स्थान दिले जाते. राजनाथसिंह गृहमंत्री असताना तेव्हाच्या सर्व सहा समित्यांमध्ये ते सदस्य होते. 
सूत्रांनुसार, कॅबिनेट समित्यांच्या पुनर्रचनेस पुन्हा एकदा मोदींनंतर दुसऱ्या स्थानावरील महत्त्व म्हणून पाहिले जात आहे. केंद्रीय दक्षता आयोग अाणि सीबीआयसारख्या प्रमुख पदांवर नियुक्त्या करणाऱ्या समित्यांमध्ये केवळ मोदी व शहा यांचाच समावेश आहे. गुंतवणूक व विकास या दोन नव्या समित्या असून या समित्यांचे अध्यक्षपद मोदींकडे असेल. गंतवणूक व रोजगाराच्या दृष्टीने या समित्यांचे महत्त्व आहे. 


शहा यांना वाजपेयींचा बंगला :

गृहमंत्री अमित शहा यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी राहत होते तो कृष्णा मेनन मार्गावरील बंगला दिला जाऊ शकतो. २००४ मध्ये पराभूत झाल्यानंतर वाजपेयी यांना हा बंगला मिळाला होता. ते या बंगल्यात कुटुंबासह १४ वर्षे राहिले. गेल्या ऑगस्टमध्ये त्यांचे निधन झाल्यापासून हा बंगला रिक्त होता.

 

नीती आयोगातही शहा
नीती आयोगाचीही पंतप्रधान मोदी यांनी पुनर्रचना केली असून यात गृहमंत्री अमित शहा स्थायी सदस्य असतील. राजनाथसिंह, निर्मला सीतारमण, नरेंद्रसिंह तोमर सदस्य असतील.

बातम्या आणखी आहेत...