आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Said To Rahul Gandhi 'If You Did Not Read CAA Then We Will Send Italian Translation'

'पक्षाला मातांचा शाप लागत आहे' : अमित शहा, राहुल यांना टोमणा - 'सीएए वाचला नसेल तर इटालियन अनुवाद पाठवू'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) बाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी राजस्थानातील जोधपूरमध्ये सभा घेतली. त्यांनी आरोप केला की, व्होट बँकेसाठी काँग्रेस सीएएबाबत अपप्रचार करत आहे. राहुल गांधींवर टीका करत त्यांनी सांगितले की, जर त्यांना सीएएवर चर्चा करायची असेल तर कोठेही या. त्यांनी हा कायदा वाचला नसेल तर इटालियनमध्ये अनुवाद करून पाठवून देऊ. शहा यांनी कोटा रुग्णालयात १०५ मुलांच्या मृत्यूवरून काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, गेहलोत जी, सीएएला विरोध करण्याऐवजी कोटामध्ये रोज मरणाऱ्या मुलांची काळजी करा. काँग्रेसला मातांचा शाप लागत आहे.

काँग्रेसवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत शहा म्हणाले की, सावरकरांसारख्या देशभक्ताला काँग्रेस विरोध करत आहे. त्यांना लाज वाटायला हवी. व्होट बँकेच्या राजकारणालाही सीमा असते. ते म्हणाले की, आज काँग्रेस, ममतादीदी, सप, बसप, केजरीवाल आणि डावे सर्व मिळून सीएएचा विरोध करत आहेत. या सर्व पक्षांना चर्चेचे त्यांनी आव्हान दिले.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सभा

नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जोधपूरमध्ये जनजागृतीसाठी सभा घेण्यात येत आहेत. त्यातील ही दुसरी सभा हाेती.

सीएए जनजागृतीसाठी घरोघरी जातील अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाचे वरिष्ठ नेते ५ जानेवारीपासून घरोघरी जात सीएएबाबत लोकांना माहिती देतील. १० दिवसांच्या या मोहिमेत तीन कोटी कुटुंबांशी संपर्क करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अमित शहा दिल्लीत, तर कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा गाझियाबादमध्ये मोहिमेची सुरुवात करतील. राजनाथ सिंह लखनऊ, नितीन गडकरी नागपूर, निर्मला सीतारमण जयपूरमध्ये घरोघरी जात लोकांना कायद्याची माहिती देतील.

भारताची परंपरा समृद्ध; पाकशी तुलना का : ममता

सिलिगुडी : वेळोवेळी पाकिस्तानचे नाव घेत असल्याने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांनी विचारले की, मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे दूत. सीएएविरोधातील रॅलीत ममता म्हणाल्या की, भारत समृद्ध संस्कृती आणि परंपरा असलेला मोठा देश आहे. पंतप्रधान आमच्या देशाची वारंवार पाकिस्तानशी तुलना का करत असतात? तुम्ही भारताबद्दल बाेला.