आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah To Host A Dinner For Nda Leaders Tomorrow, Sonia Gandhi Invites Upa Leaders Too After Exit Polls Lok Sabha Elections 2019

आता तयारी निकालांची: अमित शहांची मंगळवारी एनडीएच्या नेत्यांसोबत डिनर डिप्लोमसी, केंद्रीय कॅबिनेटची बैठकही बोलावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधीपक्षांसह सर्वच राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्ष राजकीय गणिते जुळवण्याच्या तयारीत आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांना मंगळवारी रात्रीभोजसाठी निमंत्रित केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, याच दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटची देखील बैठक होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी रविवारीच सर्वेक्षण आणि एक्झिट पोल जाहीर झाले. 10 पैकी 9 एक्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असे भाकित वर्तवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील निकालांच्या पार्श्वभूमीवर यूपीए घटकपक्षांची बैठक बोलावली आहे.

 

भाजप सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले, की पश्चिम बंगालच्या राजकीय तज्ज्ञांसाठी निकाल धक्कादायक असतील. या ठिकाणी भाजपसाठी आणखी चांगले निकाल लागतील. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपने सर्वांना धक्का दिला होता. तसेच निकाल आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतील असा दावा त्यांनी केला. महाआघाडीवर बोलताना ही आघाडी सुरुवातीपासूनच फेल गेली. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता मतदान झाल्यानंतर देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अशाने काहीच मिळणार नाही असेही राम माधव यांनी सांगितले.


दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी केंद्री मंत्री तसेच काँग्रेस नेते शशि थरूर आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एक्झिट पोलचे निकाल खोटे असल्याचे सांगितले आहे. तर ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलला निव्वळ अफवांवर आधारित अंदाज असे संबोधले आहे. एक्झिट पोलच्या बहाण्याने कथितरित्या ईव्हीएमशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा धक्कादायक आरोप ममतांनी केला. तर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्झिट पोल सगळेच खोटे ठरू शकत नाहीत असे म्हटले आहे.