आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, विधेयक सुवर्ण अक्षरात लिहीले जाईल- नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 तासांच्या चर्चेनंतर सोमवारी लोकसभेत विधेयक पास झाले, बाजूने 311 आणि विरोधात 80 मत पडले

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज(बुधवार) दुपारी 12 वाजता नागरिकत्व संशोधन विधेयक, 2019 राज्यसभेत सादर करणार आहेत. हे विधेयक याआधीच सोमवारी लोकसभेत पास झाले आहे. विरोधी पक्ष आणि पुर्वेकडील राज्य विधेयकाच्या विरोधात आहेत. मंगळवारी असाम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी विधेयकाविरोधात प्रदर्शन करण्यात आले. काँग्रेस या विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे. पक्षाने राज्यातील काँग्रेसला पक्ष कार्यालयाबाहेर प्रदर्शन करण्याचे आदेश दिले आहेत.संसद परिसरात खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशींनी सांगितले की, पंतप्रधानांनी नागरिकत्व विधेयकाला ऐतिहासिक असल्याचे सांगितले. या विधेयकाला दुपारी 12 वाजता राज्यसभेत सादर केले जाणार आहे. भाजपला आशा आहे की, राज्यसभेत हे विधेयक पास होईल. राज्यसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसकडून कपिल सिब्बल, तृणमूलचे डेरेक ओ' ब्रायन आणि सपाचे रामगोपाल यादवसह अनेक नेते आपले मुद्दे मांडणार आहेत. 

वॉकआउट करने मोदींना समर्थन दिल्यासारखेच- दिग्विजय

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह म्हणाले की, "हे पाहणे औत्सुक्याचे ठरले की, ज्या पक्षांची विचारधारा संघ आणि भाजपविरोधी आहे, ते या विधेयकाकडे कोणत्या नजरेने पाहत आहेत. चर्चेदरम्यान कोणत्याही पक्षाने वॉक आउट करू नये, असे केल्याने मोदींना आणि विधेयकाला समर्थ दिल्यासारखेच आहे."