आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीपर्यंत अमित शहाच भाजपाध्यक्ष, पक्षांतर्गत निवडणुका टाकल्या लांबणीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अमित शहा हेच भाजपचे अध्यक्ष राहतील. त्यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका लांबणीवर टाकल्या जातील. भाजप सूत्रांनुसार शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी याबाबत प्रस्ताव ठेवला होता. शहा यांचा कार्यकाळ २३ जानेवारी २०१९ ला संपणार होता. विरोधकांच्या महाआघाडीच्या खटाटोपावर टीका करत शहा म्हणाले, ही आघाडी खोटेपणावर आधारित आहे. आम्ही मेकिंग इंडियासाठी झटतोय तर काँग्रेस ब्रेकिंग इंडियासाठी. भाजप १९ राज्यांत सत्तेत आहे. त्यात आणखी चांगली कामगिरी करून पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील.


शहांचा 'अजेय भाजप' मंत्र
दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेत आयोजित कार्यकारिणीत अमित शहांनी 'अजेय भाजप'चा मंत्र दिला. नुकत्याच झालेल्या सवर्ण आंदोलनाबाबत शहा म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्यावरून विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

परिसर अटलमय : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतरच्या भाजपच्या या पहिल्याच बैठकीत त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यावर भर दिला आहे.

 

पक्षांतर्गत निवडणुका टाळण्याची २ कारणे
१) लोकसभेसाठी पुढील ८ महिने महत्त्वाचे आहेत. पक्षांतर्गत निवडणूक हा प्रदीर्घ कार्यक्रम आहे. जानेवारीआधी त्याची तयारी सुरू झाल्यास लोकसभेच्या तयारीवर परिणाम होईल. शहा कार्यकर्त्यांना म्हणाले, पुढील सात महिने फक्त कमळ व भारतमाता लक्षात ठेवा, बाकी सर्व विसरून जा.
२) भाजपमध्येही कोणताही सदस्य ३-३महिन्यांच्या सलग २ टर्मसाठी अध्यक्ष राहू शकतो. राजनाथसिंह मंत्री बनल्यानंतर त्यांच्या कार्यकाळाच्या मध्येच जुलै २०१४ मध्ये शहा राष्ट्रीय अध्यक्ष बनले. जानेवारी २०१६ मध्ये त्यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांच्याच हाती पक्षाची धुरा राहील.

 

 

बातम्या आणखी आहेत...