आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केले? अमित शहा यांचा सवाल; शरद पवारांचा चाेख जबाब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/ काेल्हापूर : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक लावू शकत नाहीत. इतके ते प्रामाणिक आहेत. मात्र अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे,' असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कराड येथील जाहीर सभेतून केले.

उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी तलवार देऊन शहा यांचे स्वागत केले. भाषणात ते म्हणाले, 'महाराष्ट्रात सिंचनावर जर ७० कोटी े खर्च केल्याचे अजित पवार सांगतात. मग एवढा खर्च केलेले पाणी गेले कुठे याचे उत्तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांनी द्यावे. आघाडीचे सरकार दहा वर्षे केंद्रात होते त्यावेळी सुद्धा शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काही केले नाही.'

काेल्हापुरात सेना खासदार गैरहजर
काेल्हापूर येथील प्रचार सभेत अमित शहांनी ३७० कलम व केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध याेजनांची उजळणी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष मुळचे काेल्हापूरकर असल्याने त्यांचेही शहांनी सभेत जाेरदार काैतुक केले. या सभेला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे मात्र उपस्थित नसल्याने युतीत नाराजीची चर्चा रंगली हाेती.

चाळीसगाव : 'मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण समाेर लढायलाच कुणी नाही. मी कुस्तीचा राज्यातील संघटनेचा अध्यक्ष आहे, मग आमच्याकडे पैलवानांची काय कमी असेल. पण आम्ही 'कुणाशीही' कुस्ती खेळत नाही,' असे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व शेंदुर्णी येथील प्रचारसभेत दिले. 'महाराष्ट्रासाठी मी काय केले असा प्रश्न विचाणाऱ्यांनी माझा पद‌्मविभूषण पुरस्कार देऊन गाैरव केला हाेता,' असा टाेलाही त्यांनी शहांना लगावला. ३७० कलम रद्द केल्याच्या वल्गना करणाऱ्यांना माझे आव्हान आहे. अजूनही चार राज्यात ३७१ कलम लागू आहे. तेथील लाेकांना स्वत:च्या जागाही विकता येत नाहीत. हिंमत असेल तर सरकारने ३७१ कलम रद्द करावेच.'

आम्ही नटरंग नाहीत : मुख्यमंत्री
'शनिवारीही पवारांनी कुस्ती पहिलवानासाेबत हाेते, अशांसाेबत (हातवारे करत) नाही,' असा टाेला लगावला हाेता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'मानसिकता ढासळल्याने पवार असे हातवारे करीत आहेत. उत्तर आम्हालाही देता येते; परंतु हातवारे करता येत नाही. कारण आम्ही नटरंगसारखे काम केले नाही. त्यामुळेच असे हातवारे करणे आम्हाला शाेभत नाही.'

बातम्या आणखी आहेत...